Maharashtra School Reopen | 1 फेब्रुवारीपासून शाळा सुरु होणार? राजेश टोपेंनी दिले स्पष्ट संकेत

जालना : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra School Reopen | राज्यात कोरोनाची (Coronavirus in Maharashtra) तीसरी लाट आल्यानंतर राज्यातील शाळा (School), कॉलेज, महाविद्यालय (college) बंद करण्यात आले होते. मात्र, आता राज्यातील कोरोनाची लाट (Corona Wave) ओसरत चालल्यामुळे पुन्हा एकदा शाळा आणि महाविद्यालये सुरु (Maharashtra School Reopen) होत आहेत. राज्यातील महाविद्यलय 1 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहेत. तर पहिली ते पाचवी पर्यंतचे वर्ग 1 फेब्रुवारी पासून सुरु करण्याचा राज्य सरकारचा (State Government) मानस आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली.

 

गेल्या दोन वर्षापासून शाळा-महाविद्यालय बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. अलीकडेच शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला. परंतु ओमायक्रोनचे (Omycron) रुग्ण वाढत असल्याने शाळा पुन्हा बंद करण्यात आल्या. पण, आता पालकांकडून शाळा सुरु (Maharashtra School Reopen) करण्याची मागणी होत आहे. यावर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी देखील शाळा सुरु करण्यास होकार दर्शवला आहे.

 

आता शाळा सुरु केल्या आहेत. जवळपास सगळीकडे ज्युनिअर कॉलेज (Junior College) सुरु केले आहेत.
शाळा सुद्धा झाल्या आहेत. जालना शहरात सुद्धा लक्ष ठेवून आहोत. 1 फेब्रुवारीपासून शाळा सुरु करण्याचा आपला मानस आहे.
आणि त्या दृष्टीने विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, याचा विचार करत आहोत, असंही टोपे यांनी सांगितले.

 

तसेच विद्यार्थ्यांना जर कमी प्रमाणात कोरोनाची लागण झाली तरी मुलांना कुठलेच लक्षण दिसत नाही, ते लगेच बरेही होत आहेत.
त्या दृष्टीने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी 1 फेब्रुवारीपासून शाळा सुरु करण्याचा जालन्यात निर्णय घेतल्याचे टोपे यांनी सांगितले.

1 तारखेपासून कॉलेज सुरु होणार
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होत आहे. त्यामुळे राज्यातील शाळांप्रमाणेच कॉलेजसही सुरु करण्याची मागणी होत आहे.
त्यामुळे कोरोनाचे सर्व नियम पाळून आणि कोरोना प्रतिबंधक उपाय योजना पाळून राज्यातील कॉलेजेस पुन्हा सुरु करावीत
असा विचार शासनापुढे विचाराधीन असल्याचे सांगण्यात येत आहे.
त्यामुळे लवकरच म्हणजे 1 फेब्रुवारीपासून राज्यातील सर्व कॉलेजेस सुरु होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 

Web Title :- Maharashtra School Reopen | schools in maharashtra will start from february 1 rajesh tope gave a clear signal

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | पुण्याच्या एरंडवणे येथील ‘हिमाली’ गृहरचना संस्थेत 19 लाखांचा आर्थिक गैरव्यवहार, सचिव सुरेश शहा यांच्यासह तिघांवर FIR

 

Bigg Boss 15 | बिग बॉस 15 मध्ये रश्मि देसाईसोबत राखी सावंतनं केलं जोरदार भांडण, रश्मि म्हणाली – शमिता होणार बिग बॉस 15ची विजेती…

 

Home Remedies For Constipation | बद्धकोष्ठता पासून सुटका मिळवायची असेल तर खा ‘या’ 4 गोष्टी; जाणून घ्या