Coronavirus : दिलासादायक ! राज्यात गेल्या 24 तासात 31,964 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, रिकव्हरी रेट 93.46 %

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   राज्यात रुग्ण वाढीचा दर कमी झाला असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. राज्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने 1 जून पर्यंत लॉकडाऊन केला आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात नवीन रुग्णांची संख्या कमी होत असून बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. यामुळे राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. गेल्या 24 तासांत राज्यात 20 हजार 295 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर 31 हजार 964 रुग्ण बरे झाले आहेत.

राज्यात गेल्या 24 तासामध्ये 31 हजार 964 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण 53 लाख 39 हजार 838 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 93.46 टक्के एवढे झाले आहे. राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 57 लाख 13 हजार 215 इतके झाले असून रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 16.51 टक्के इतके आहे.

Maratha Reservation : प्रकाश आंबेडकरांनी खा. संभाजीराजेंना सांगितला ‘हा’ कायदेशीर मार्ग

आज राज्यात 443 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात रुग्ण मृत्यू होण्याचे प्रमाण 1.65 टक्के आहे. सध्या राज्यामध्ये 2 लाख 76 हजार 573 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3 कोटी 46 लाख 08 हजार 985 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 57 लाख 13 हजार 215 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 20 लाख 53 हजार 329 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत. तर 14 हजार 981 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

 

Pune : शासकीय नोकरदार महिलेची फसवणूक करत अनैसर्गिक अत्याचार, अश्लील फोटो काढून मारहाण; धमकावून 25 लाखाच्या खंडणीची मागणी, पुण्यातील खासगी कंपनीत बडया पोस्टवरील एकावर FIR

Pune : ‘प्रवासी सेवेबरोबर एक पाऊल पुढे टाकून पीएमपीची शहराला मदत’ – पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र जगताप