Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात 4,410 जण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोना (Coronavirus in Maharashtra) बाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत (New Cases) आज (शुक्रवार) घट झाल्याचे दिसत आहे. बरे होणाऱ्या रुग्णांची (Recover Patient) संख्या देखील आज वाढली आहे. याबरोबरच दैनंदिन मृत्यूची संख्या देखील घटली आहे. राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर रुग्णसंख्या कमी होत आहे. मगील काही दिवसांपासून राज्यातील दैनंदिन कोरोना (Coronavirus in Maharashtra) रुग्णांची संख्या चार हजाराच्या आसपास स्थिरावली आहे. आजही राज्यात 3 हजार 586 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तसेच 4 हजार 410 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

राज्यात आतापर्यंत 63 लाख 24 हजार 720 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery rate) 97.08 टक्के आहे.
तसेच आज दिवसभरात 67 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यंत राज्यात 1 लाख 38 हजार 389 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
त्यामुळे राज्यातील मृत्यूदर (Case Fatality Rate) 2.12 टक्के इतका झाला आहे.

सध्या राज्यात 48 हजार 451 रुग्णांवर उपचार सुरु (Active patient) आहेत.
राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5 कोटी 67 लाख 09 हजार 128 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 65 लाख 15 हजार 111 (11.49 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
राज्यात सध्या 2 लाख 81 हजार 072 लोक होम क्वारंटाईन आहेत तर 1,813 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Web Titel :- Coronavirus in Maharashtra | Maharashtra State Coronavirus Update

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Journalist In Police Custody | खंडणी प्रकरणी पत्रकार शिरसाठला ‘एवढ्या’ दिवसांची पोलीस कोठडी

Pune Crime | हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलतेंना बळजबरीने दिली 50000 ची ‘लाच’, दौंडमधील दत्तात्रय पिंगळे आणि मांजरीतील अमित कांदेला ACB कडून अटक

MP Girish Bapat | PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त खा. बापट यांचा अनोखा उपक्रम