MP Girish Bapat | PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त खा. बापट यांचा अनोखा उपक्रम

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – ‘एक कार्यकर्ता पंचवीस लाभार्थी’ असा अनोखा उपक्रम राबवण्याचा संकल्प सोडून खा. गिरीश बापट (MP Girish Bapat) यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा वाढदिवस कसबा गणपतीच्या साक्षीने मोठ्या उत्साहात साजरा केला. येत्या वर्षभरात भाजपाचे शहरातील (Pune BJP) किमान पाच हजार कार्यकर्ते हा उपक्रम अंमलात आणतील. अशी माहिती खासदार गिरीश बापट (MP Girish Bapat) यांनी कसबा गणपती मंडळासमोर (kasba ganpati mandal) झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात दिली.

गिरीश बापट (MP Girish Bapat) म्हणाले, हे कार्यकर्ते पंतप्रधानांच्या सर्व योजना पुणेकरांपर्यंत पोहोचवतील त्याचा लाभ शहरातील किमान सव्वा लाख पुणेकरांना होईल अशी अपेक्षाही बापट यांनी व्यक्त केली. यावेळी आमदार मुक्ता टिळक (MLA Mukta Tilak), शहराध्यक्ष जगदीश मुळीक (Jagdish Mulik), स्वरदा बापट (Swarada Bapat), उज्वल केसकर, राजेश येनपुरे, उमेश गायकवाड, योगेश समेळ, गायत्री खडके, प्रमोद कोंढरे, वृशाली चौधरी, अजय वीरकर, बादशहा सय्यद, पुष्कर तुळजापूरकर, सुहास कुलकर्णी, सतीश मोहोळ, निलेश कदम, बापू मानकर, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

एक कार्यकर्ता पंचवीस लाभार्थी या उपक्रमाची माहिती देताना खासदार बापट म्हणाले की,
जनधन योजना (Jandhan Yojana), बेटी बचाओ बेटी पढाओ योजना (Beti Bachao Beti Padao Yojana), मुद्रा योजना (Mudra Yojana), अटल पेन्शन योजना (Atal Pension Yojana), प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (Pradhan Mantri Suraksha Vima Yojana) अशा अनेक योजना पंतप्रधान मोदी यांनी सुरू केल्या आहेत.
त्या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे हेच उद्दिष्ट कार्यकर्त्यांनी नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने समोर ठेवले पाहिजे.
भारतीय जनता पक्ष हा सर्वसामान्यांच्या हितासाठीच काम करतो.
तळागाळातील गरिबांची उन्नती करणे हेच पक्षाचे ध्येयधोरण आहे.
हे आपण अशा उपक्रमातून दाखवून देणार आहोत. सतिश मोहोळ यांनी सूत्रसंचालन केले.

Web Titel :- MP Girish Bapat | Bapat’s unique initiative on the occasion of PM Modi’s birthday

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

LIC Jeevan Labh Policy | एलआयसीचा धमाका ! 233 रुपये खर्च करून मिळतील 17 लाख रुपये, जाणून घ्या

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 140 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Aadhaar संबंधी कोणत्याही कॉलसाठी फॉलो करा UIDAI चा ‘हा’ सल्ला, अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान