Coronavirus : राज्यात दिवसभरात ‘कोरोना’चे 3579 नवीन रुग्ण, 70 जणांचा मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील कोरोनाचा (Coronavirus) संसर्ग अद्यापही वाढतच आहे. गुरुवारी (दि.14) दिवसभरात 3 हजार 579 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर कोरोनातून बरे झालेल्या एकूण 3 हजार 309 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे आतापर्यंत 18 लाख 77 हजार 588 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. या आकडेवारी नुसार राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.75 टक्के इतके झाले आहे. अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता 19 लाख 81 हजार 623 वर पोहचली आहे. सध्या राज्यात 52 हजार 558 ॲक्टिव्ह केसेस आहेत. राज्यात सर्वाधिक ॲक्टिव्हरुग्ण पुणे जिल्ह्यात असून पुणे जिल्ह्यात असून पुणे जिल्ह्यामध्ये 15 हजार 601 ॲक्टिव्ह केसेस आहेत. पुण्यानंतर ठाण्यात 9 हजार 910 तर मुंबईत 7 हजार 334 आणि नागपूरमध्ये 5 हजार 145 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

राज्यात आज 70 रुग्णांचा मृत्यू झाला असून राज्यात आजपर्यंत 50 हजार 291 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यू दर 2.54 इतका झाला आहे. राज्यात सर्वाधिक मृत्यू मुंबईमध्ये झाले आहेत. मुंबईत 11 हजार 221 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर पुणे जिल्ह्यात 7848 जणांचा मृत्यू झाला आहे. ठाण्यात 5 हजार 663 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 1 कोटी 36 लाख 23 हजार 298 प्रयोगशाळा नमुन्यापैकी 19 लाख 81 हजार 623 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 14.55 टक्के आहे. सध्या राज्यात 1 लाख 96 हजार 829 होम क्वारंटाईन आहेत. तर 2 हजार 403 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.