Coronavirus : राज्यात ‘कोरोना’चे 51 हजार 880 नवीन रुग्ण, 65 हजार 934 रुग्णांना डिस्जार्ज

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   राज्यात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. राज्यात मागील काही महिन्यापासून रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या दोन दिवसांत रुग्णांची संख्या 50 हजारांच्या आत आली होती. मात्र, आज पुन्हा एकदा राज्यातील नवीन रुग्णांची संख्या 50 हजारांच्या पुढे गेली आहे. राज्यात रुग्णसंख्या वाढत असताना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असल्याने दिलासा मिळत आहे. परंतु रुग्णांची संख्या वाढत असताना मृतांचा आकडा वाढत असल्याने चिंता कायम आहे. गेल्या 24 तासात राज्यात 51 हजार 880 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 891 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आज राज्यात 65 हजार 934 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 41 लाख 07 हजार 092 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण घटत चालले आहे. सध्या राज्यामध्ये कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 85.16 टक्के आहे. रुग्ण वाढत असताना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. आज राज्यात 891 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत राज्यात 71 हजार 742 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात रुग्ण मृत्यू होण्याचे प्रमाण 1.49 टक्के आहे.

सध्या राज्यामध्ये 6 लाख 41 हजार 910 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत. राज्यात सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण पुण्यात आहेत पुण्यात 1 लाख 09 हजार 531 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 2 कोटी 81 लाख 05 हजार 382 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 48 लाख 22 हजार 902 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 17.16 टक्के आहे. सध्या राज्यात 39 लाख 36 हजार 323 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत. तर 30 हजार 356 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.