Coronavirus : दिलासादायक ! राज्यात ‘कोरोना’चे 42 हजार नवीन रुग्ण, 54 हजार रुग्णांना डिस्चार्ज

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  महाराष्ट्रातील कोरोना संसर्गाचा विळखा सैल होत असल्याचे स्पष्ट संकेत मिळू लागले आहेत. राज्यात मागील काही दिवसांमध्ये दैनंदिन रुग्णसंख्येत मोठी घट होत असून हा खूप मोठा दिलासा आहे. राज्यात गेल्या 24 तसात 41 हजार 582 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 54 हजार 335 रुग्णांनी कोरोनावर मात करुन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यतील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी होऊन रिकव्हरी रेट वाढला आहे. सध्या राज्याचा रिकव्हरी रेट 89 टक्क्यांच्या जवळ पोहचला आहे.

आजपर्यंत 46 लाख 54 हजार 731 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. सध्या राज्यामध्ये कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 88.34 टक्के आहे. रुग्ण बरे होत असताना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. आज राज्यात 850 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत राज्यात 78 हजार 857 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात रुग्ण मृत्यू होण्याचे प्रमाण 1.5 टक्के आहे.

सध्या राज्यामध्ये 5 लाख 33 हजार 294 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत. राज्यात सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण पुण्यात आहेत पुण्यात 1 लाख 01 हजार 181 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3 कोटी 03 लाख 51 हजार 356 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 52 लाख 69 हजार 292 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 17.36 टक्के आहे. सध्या राज्यात 35 लाख 02 हजार 630 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत. तर 28 हजार 847 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.