Coronavirus in Maharashtra : दिलासादायक ! राज्यात गेल्या 24 तासात 52,898 रूग्ण कोरोनामुक्त

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्यात मोठ्या प्रणात रुग्णांची संख्या वाढली. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आला. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकारने लॉकडाऊन जाहीर केले. त्याचा परिणाम होताना दिसून येत आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात नवीन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. राज्यातील अ‍ॅक्टिव रुग्णांची संख्या 7 लाखांपर्यंत पोहोचली होती. मात्र, आता रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाल्याचे पहायला मिळत असून राज्याचा रिकव्हरी रेट देखील वाढला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 28 हजार 438 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 52 हजार 898 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आजपर्यंत 49 लाख 27 हजार 480 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. सध्या राज्यामध्ये कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 90.69 टक्के आहे. रुग्ण बरे होत असताना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. आज राज्यात 679 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत राज्यात 83 हजार 777 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात रुग्ण मृत्यू होण्याचे प्रमाण 1.54 टक्के आहे.

सध्या राज्यामध्ये 4 लाख 19 हजार 727 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत. राज्यात सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण पुण्यात आहेत पुण्यात 72 हजार 089 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3 कोटी 15 लाख 88 हजार 717 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 54 लाख 33 हजार 506 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 17.2 टक्के आहे. सध्या राज्यात 30 लाख 97 हजार 161 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत. तर 25 हजार 004 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.