Maharashtra State Police Sports Competition On Pune | पुण्यात महाराष्ट्र राज्य पोलिस क्रीडा स्पर्धेचा शनिवारपासून प्रारंभ, 13 संघांचा समावेश

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra State Police Sports Competition On Pune | महाराष्ट्र राज्य पोलिस क्रीडा स्पर्धेचा प्रारंभ उद्यापासून (दि. 7 जानेवारी) वानवडीतील राज्य राखीव पोलिस दलाच्या मैदानावर (SRPF Ground, Pune) होणार आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या 18 क्रीडा प्रकारात राज्यातील 13 संघातील तब्बल 2 हजार 833 पोलिस अधिकारी व कर्मचारी सहभागी होणार असल्याची माहिती राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक (प्रशासन) अनुपकुमार सिंग (IPS Anup Kumar Singh), पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Retesh Kumaarr) आणि सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक (IPS Sandeep Karnik) यांनी दिली. यावेळी अप्पर आयुक्त रामनाथ पोकळे (IPS Ramnath Pokale), जालिंदर सुपेकर (IPS Jalinder Supekar), राजेंद्र डहाळे (IPS Rajendra Dahale) आणि राज्य राखीव पोलिस दलाचे पोलिस उपमहानिरीक्षक दिपक साकोरे (IPS Deepak Sakore) उपस्थित होते. (Maharashtra State Police Sports Competition On Pune)

 

 

पुणे शहर पोलिस (Pune City Police) आणि पिंपरी-चिंचवड पोलिसांचा (Pimpri Chinchwad Police) एकच संघ असणार आहे. स्पर्धेत एकुण 13 संघ सहभागी होणार आहेत. राज्य राखीव पोलिस दलाच्या वानवडी येथील मैदानावर या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 33 व्या राज्य पोलिस क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्याचा मान पुणे पोलिस आयुक्तालयाला मिळाला आहे. पोलिस महासंचालक रजनीश सेठ (IPS Rajnish Seth) यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. (Maharashtra State Police Sports Competition On Pune)

 

मैदानी खेळ, फुटबॉल, कुस्ती, बॉक्सिंग, जलतरण, वेटलिफ्टिंग, शीररसौष्ठवासह 18 क्रीडा प्रकारांचा या स्पर्धेत समावेश असणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हस्ते 11 जानेवारी रोजी होणार असून समारोप हा दि. 13 फेब्रुवारी रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर वेगवेगळ्या खेळांमध्ये प्राविण्य मिळवलेले खेळाडू देखील या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. त्यामध्ये उप अधीक्षक विजय चौधरी (DySP Vijay Chaudhary) यांच्यासह इतरांचा समावेश आहे.

 

जानेवारी 2019 नंतर प्रथमच स्पर्धेचे आयोजन

कोरोना काळामध्ये स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले नव्हते.
त्यामुळे सन 2019 नंतर प्रथमच राज्य स्तरीय स्पर्धा पुण्यात होत आहेत.
पुणे पोलिस आयुक्त पदाचा पदभार घेवुन रितेश कुमार यांना एक महिना देखील झालेला नाही
मात्र स्पर्धेच्या तयारीबाबत आम्ही सर्वजण समाधानी आणि आनंदी असल्याचे
अतिरिक्त पोलिस महासंचालक (प्रशासन) अनुपकुमार सिंग यांनी यावेळी बोलताना सांगितले.

 

Web Title :- Maharashtra State Police Sports Competition On Pune | Maharashtra State
Police Sports Tournament in Pune from Saturday, involving 13 teams

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा