Maharashtra Winter Session 2022 | संसदेचे आगामी हिवाळी अधिवेशन रंगणार; विरोधक करणार ईडीच्या चौकशीची मागणी

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – संसदेच्या आगामी हिवाळी अधिवेशनात (Maharashtra Winter Session 2022) विरोधकांकडून (Opposition Parties) मागील काही वर्षात विरोधकांवर ईडी (ED), सीबीआय (CBI) सारख्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या मार्फत होत असलेल्या कारवाईचा मुद्दा संसदीय (Parliament) समितीसमोर उपस्थित करण्यात येणार आहे. शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Shivsena Leader Sanjay Raut) यांनी ही माहिती दिली. एका मराठी वृत्तपत्राशी ते बोलत होते. पत्राचाळ घोटाळा प्रकरणात ईडीने अटक केल्यानंतर 100 दिवसांनी राऊत यांना पीएमएलए (PMLA) कोर्टाने जामीन दिला. (Maharashtra Winter Session 2022)

 

संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, ‘मागील काही वर्षात देशातील केंद्रीय तपास यंत्रणा राजकीय हेतूने सरकारच्या विरोधकांची अटक करत आहे. तपास यंत्रणांकडून होत असलेल्या या कारवाईची संयुक्त संसदीय समितीमार्फत किंवा माजी सरन्यायाधीश उदय लळीत (Uday Lalit) यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडून चौकशी करण्यात यावी अशी मागणी हिवाळी अधिवेशनात सर्व विरोधकांकडून करण्यात येणार आहे. पुढे ते म्हणाले, ‘पत्राचाळ घोटाळा प्रकरणात मला झालेली अटक ही बेकायदेशीर होती. या पत्राचाळीशी माझा काहीही संबंध नव्हता. न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे मी स्वागत करतो. देश हा राज्यघटनेच्या चौकटीत चालतो. संविधानाचे रक्षण करणे, हे आपल्या सर्वांचे काम आहे.’ सध्या देशात संविधानाची पायमल्ली होत असल्याचे त्यांनी म्हटले.

संसदेचे आगामी हिवाळी अधिवेशन (Maharashtra Winter Session 2022) वादग्रस्त ठरणार आहे.
संजय राऊत यांना जामीन देताना पीएमएलए कोर्टाने ही अटक बेकायदेशीर असल्याचे सांगितले, ईडीच्या तपासावर प्रश्न उपस्थित केले आहेत.
कर्नाटक, तेलंगणा, झारखंडमध्येही केंद्र सरकारच्या विरोधकांवर ईडी व इतर केंद्रीय संस्थांमार्फत कारवाई सुरू आहे.
विरोधी पक्षांना दडपण्यासाठी ही कारवाई सुरू असल्याचा आरोप होत आहे.
त्यात, संजय राऊतांना जामीन देताना कोर्टाने नोंदवलेल्या निरीक्षणाच्या आधारे विरोधक पक्ष आक्रमक होण्याची शक्यता आहे.

 

Web Title :- Maharashtra Winter Session 2022 | The upcoming winter session of Parliament will take place; The opposition will demand an ED inquiry

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Supriya Sule | जितेंद्र आव्हाड यांना झालेल्या अटकेचा मला अभिमान आहे – सुप्रिया सुळे

Pune Crime | नविन मिटर घेऊन देण्याच्या बहाण्याने फसवणूक, काही तासातच आरोपी गुन्हे शाखेच्या जाळ्यात

Nanded Crime | नंदिग्राम एक्सप्रेससमोर उडी घेत प्रेमीयुगुलाची आत्महत्या, भोकर रेल्वे स्थानकाजवळील घटना