Ajit Pawar | मराठवाड्यासह विदर्भातील प्रश्न सोडविण्यासाठी हिवाळी अधिवेशनाचा कालवाधी 3 आठवडे करा; अजित पवारांची मागणी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Ajit Pawar | मराठवाडा आणि विदर्भातील प्रश्नांना न्याय देण्यासाठी येत्या 19 डिसेंबर रोजी सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाचा कालावधी तीन आठवड्यांचा करावा, अशी मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. (Ajit Pawar)

 

विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाज सल्लागार समितीची मंगळवारी विधान भवनात बैठक पार पडली. या बैठकीत अजित पवार बोलत होते. तसेच मराठवाडा मुक्ती संग्रामाचा अमृतमहोत्सव सर्वपक्षीयांच्या सहभागातून भव्य प्रमाणात साजरा करावा, अशी मागणी देखील अजित पवारांनी या बैठकीत केली.

 

कोरोनामुळे दोन वर्षे हिवाळी अधिवेशन नागपूरला होऊ शकले नाही. त्यामुळे दोन वर्षांनी आता नागपूरात अधिवेशन होत आहे. त्यामुळे मागील दोन वर्षे विदर्भातील प्रश्न आणि समस्या प्रलंबित आहेत. त्या दूर करण्यासाठी नागपूर अधिवेशनाचा कालावधी वाढवावा, असे अजित पवारांचे मत आहे. विरोधी पक्षनेत्यांची मागणी विचारात घेऊन अधिवेशनच्या काळात नागपूर येथील पुढील बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्याचे आश्वासन विधानसभा अध्यक्ष डॉ. राहूल नार्वेकर यांनी दिले आहे. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. विरोधी पक्षनेत्यांच्या मागणीवर विचार करण्याची तयारी असल्याचे यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणाले आहेत. (Ajit Pawar)

येत्या 19 डिसेंबरपासून नागपूरात विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे.
हे अधिवेशन 10 दिवस चालणार आहे. 19 ते 29 डिसेंबरपर्यंत विधीमंडळाचे कामकाज चालणार आहे.
विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
यावेळी कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत अजित पवार यांनी विविध मागण्या केल्या.
यंदा मराठवाडा मुक्ती संग्रामाचे अमृतमहोत्सवी वर्ष असल्याने ते मोठ्या प्रमाणात भव्य दिव्य पद्धतीने साजरे करायचा निर्णय घेण्यात आला.
सर्व पक्षांनी एकत्र येऊन मराठवाडा मुक्ती संग्रामचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करावे, असे अजित पवार म्हणाले.

 

Web Title :- Ajit Pawar | NCP leader ajit pawar demands that the nagpur session should be held for three weeks to give justice to the issues in marathwada and vidarbha

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Nanded Crime | आदिवासी आश्रमशाळेतील 10 वर्षीय मुलीची गळफास घेऊन आत्महत्या; नांदेडमधील प्रकार

Prashant Damle | प्रशांत दामलेंची औरंगाबादच्या रस्त्यांवर टीका; ‘ती’ पोस्ट चर्चेत

Urfi Javed | उर्फी जावेद पुन्हा एकदा अडकली कायद्याच्या कचाट्यात; ‘या’ व्यक्तीने दाखल केली तक्रार