Patan Crime | अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणार्‍या तरूणावर पॉस्कोअंतर्गत गुन्हा दाखल

पाटण : पोलीसनामा ऑनलाइन – Patan Crime | माझी गर्लफ्रेंड बन असे म्हणत युवकाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा प्रकार पाटण येथे घडला आहे. त्याच्याविरोधात पोलिसांत तक्रार देण्यात आली आहे. (Patan Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित तरूण आणि मुलगी एकाच गावात राहतात. तरूणाने मुलीला ‘मला गर्लफ्रेंड नाही. त्यामुळे मला गर्लफ्रेंड शोधून दे, नाहीतर तूच माझी गर्लफ्रेंड बन’, असे म्हणत तिचा विनयभंग केला. एवढेच नाही तर, तू जर माझी गर्लफ्रेंड बनली नाहीस, तर तुझी काही महत्वाची माहिती माझ्याकडे आहे. मी तुझा फोन हॅक करायला सांगितला आहे, अशी धमकी देखील दिली. आणि तो त्या मुलीला ब्लॅकमेल करू लागला. (Patan Crime)

 

भयभीत झालेल्या मुलीने हा सर्व प्रकार तिच्या घरच्यांना सांगितला.
त्यानुसार तिच्या पालकांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली आहे.
ढेबेवाडी पोलीस ठाण्यात या प्रकरणी संबंधित तरुणावर विनयभंग आणि पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Web Title :- Patan Crime | find girlfriend for me or become my girlfriend man who harrased minor girls booked in dhebewadi patan

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Nanded Crime | आदिवासी आश्रमशाळेतील 10 वर्षीय मुलीची गळफास घेऊन आत्महत्या; नांदेडमधील प्रकार

Prashant Damle | प्रशांत दामलेंची औरंगाबादच्या रस्त्यांवर टीका; ‘ती’ पोस्ट चर्चेत

Urfi Javed | उर्फी जावेद पुन्हा एकदा अडकली कायद्याच्या कचाट्यात; ‘या’ व्यक्तीने दाखल केली तक्रार