अभिनेता सोनू सूदला महाराष्ट्राच्या ‘या’ दिग्गज मंत्र्याचा सलाम, म्हणाले – ‘स्क्रिनवरील हा विलन खरा हिरो’ !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  परप्रांतीय मजुरांना घरी जाण्यासाठी बसची व्यवस्था करून दिल्याबद्दल महाराष्ट्राचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी अभिनेता सोनू सूदचं कौतुक केलं आहे. आज जयंत पाटील यांनी ट्विट करत सोनू सूदला खरा हिरो म्हटलं आहे.

जयंत पाटील यांनी सोनू सूदचं कौतुक करताना म्हटलं की, “सोनू सूद घरी जाण्यास इच्छुक मजुरांना बस अरेंज करून देत त्यांची मदत करत आहे. पडद्यावर विलनची भूमिका साकारणारे सोनू सूद प्रत्यक्षात प्रेरणा देणारे हिरो आहेत. गॉड ब्लेस हिम” असं म्हणत जयंत पाटील यांनी सोनूवर स्तुती सुमनं उधळली आहेत.

जयंत पाटील यांनी ट्विट करताना एक फोटोही शेअर केला आहे. यात सोनू बसशेजारी उभा असल्याचं दिसत आहे. या त्याच बस आहे ज्या सोनूनं प्रवासी मजुरांच्या घरवापसीसाठी अरेंज केल्या आहेत.

जयंत पाटील यांचं हे ट्विट सध्या सोशलवर व्हायरल होत आहे. एका बड्या नेत्यानं सोनूचं कौतुक केल्यानं चाहतेही खूप खुश झाले आहे. अनेकांनी कमेंट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. .

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like