MahaTET Question Paper Leak Case | महाराष्ट्र परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपेकडं सापडलं घबाड ! जावयाकडून 2 कोटीची रोकड आणि सोनं पुणे पोलिसांकडून जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – MahaTET Question Paper Leak Case | पुणे सायबर पोलिसांच्या (Pune Cyber Police) चौकशीत आरोग्य भरती प्रक्रियेतील पेपर फुटीनंतर तपास सुरु केला होता. याच दरम्यान त्यांना म्हाडा परीक्षेचा (MHADA exam) पेपर फोडला जाणार असल्याची लिंक लागली. याचा तपास करताना महाटीईटी परीक्षेतही गैरप्रकार (MahaTET Question Paper Leak Case ) झाल्याचे समोर आले. पुणे सायबर पोलिसांनी महाराष्ट्र परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे (Commissioner of Maharashtra State Council of Examination Tukaram Supe) आणि अभिषेक सावरीकर (Abhishek Savarikar) यांच्यासह आणखी एकाला अटक (Arrest) केली होती. पुणे पोलिसांनी तुकाराम सुपेच्या घरावर आणि त्याच्या जावयाच्या तसेच जावयाच्या मित्राच्या घरावर छापा टाकून दोन कोटी रुपयांची रोकड आणि मोठ्या प्रमाणात सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. टीईटी परीक्षेत घोटाळा झाल्याचे (TET Exam Case) समोर येताच राज्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.

 

पुणे सायबर पोलिसांनी गुरुवारी (दि.16) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदचे आयुक्त तुकाराम नामदेव सुपे (Tukaram Namdev Supe) आणि शिक्षण विभागात सल्लागार म्हणून काम करणाऱ्या अभिषेक सावरीकर यांना अटक केली होती. सुपे याला अटक केल्यानंतर त्याच्या घराची झडती घेतली होती. या झडतीत पोलिसांना परीक्षेच्या माध्यमातून गैरप्रकारे (MahaTET Question Paper Leak Case) जमा केलेले 88 लाख 49 हजार 980 रुपये रोख, सोन्याचे नाणे (Gold coin), दागिने (Jewelry) आणि साडेपाच लाख रुपयांची एफडी केल्याची कागदपत्र जप्त केली होती.

 

पोलीस कोठडीत तुकाराम सुपे याच्याकडे केलेल्या चौकशीत पैशांच्या दोन बॅगा त्याने मुलीकडे ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तसेच जावयाने त्याच्या मित्राकडे पैशाची बॅग ठेवल्याचे तपासात समोर आले. पोलिसांनी जावई नितीन पाटील (Nitin Patil) आणि मुलगी कोमल पाटील (Komal Patil) यांची चौकशी करुन त्यांच्या आळंदी येथील घराची झडती घेतली. त्यावेळी 97 हजार रुपये पोलिसांना मिळाले.

 

 

मात्र, दोन बॅगा मिळाल्या नसल्याने पोलिसांनी जावयाकडे आणि मुलीकडे कसून चौकशी केली. चौकशी दरम्यान नितीन पाटील याने त्याचा मित्र विपीन याच्या वाघोली येथील बंद घरात बॅग ठेवल्याचे सांगितले. पोलिसांनी वाघोली येथील विपीनच्या बंद घराची झडती घतेली असता दोन बॅग आणि एक सुटकेस पोलिसांना सापडली. पोलिसांनी बॅगांची तपासणी केली असता बॅगेत 1 कोटी 58 लाख 35 हजार 010 रुपये रोख तसेच सुटकेस आणि दुसऱ्या एका बॅगेत दागिन्यांचा डबा पोलिसांना आढळून आला. यामध्ये 44 वेगवेगळ्या प्रकारचे दागिने होते. पोलिसांनी सर्व मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांच्या तपासादरम्यान संजय शाहूराव सानप Sanjay Shahurao Sanap (वय-40 रा. वडझरी, ता. पाटोदा, बीड) याचा या गुन्ह्यात सहभाग असल्याचे उघड झाले. पोलिसांनी रविवारी (दि.19) सानप याला अटक केली.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta),
सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Joint CP Dr Ravindra Shisve),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale),
उपायुक्त भाग्यश्री नवटके (DCP Bhagyashree Navatke),
सहायक पोलीस आयुक्त विजयकुमार पळसुले (ACP Vijaykumar Palsule)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कुमार घाडगे (Police Inspector Kumar Ghadge),
पोलीस उपनिरीक्षक अनिल डफळ (PSI Anil Daffal), पडवळ,
सदेश कर्णे, नितेश शेलार, नितिन चांदणे, कोमल भोसले, सौरभ घाडगे यांच्या पथकाने केली.
पुढील तपास पोलीस निरीक्षक कुमार घाडगे करीत आहेत.

 

Web Title :- MahaTET Question Paper Leak Case | Pune Police seized 2 crore cash and gold from Maharashtra Examination Council Commissioner Tukaram Supe’s home and his son in law

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा