Mahavikas Aghadi | …तर स्थानिक पातळीवर महाविकास आघाडी होणार नाही; काँग्रेसपाठोपाठ राष्ट्रवादीचाही स्वबळाचा नारा

मुंबई न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  Mahavikas Aghadi | राज्यात तिन्ही पक्ष मिळून महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार स्थापन झाले आहे. असे असताना देखील काही दिवसापूर्वी आगामी विधानसभा काँग्रेस (Congress) स्वबळावर लढणार असा नारा काँग्रेसने नारा दिला. तर आता येत्या 14 महानगरपालिका (Municipal Corporation elections) आणि जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष आपली मोर्चेबांधणी करण्याच्या तयारीत आहेत. यातच आता राष्ट्रवादीने (NCP) देखील स्थानिक पातळीवर स्वबळाचा नारा दिला आहे. स्थानिक पातळीवर सरसकट महाविकास आघाडी होणार नाही, स्थानिक परिस्थितीनुसार कोणासोबत जायचं यावर त्या पक्षासोबत आघाडी केली जाईल, अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादीचे नेते (NCP) आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मांडली आहे.

मंत्री नवाब मलिक (Minister Nawab Malik) यांनी आगामी महापालिका निवडणुकीत (Municipal elections) कुणासोबत आघाडी करायची, याबाबत महत्त्वाचा खुलासा केला आहे.
त्यावेळी मलिक यांनी मुंबईत माध्यमांशी सवांद साधला.
त्यावेळी ते म्हणाले की, आमची स्पष्ट भूमिका आहे की,
स्थानिक परिस्थितीनुसार निवडणुका होणार आहे.
त्यामुळे या ठिकाणी भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी परिस्थिती नाही.
त्यामुळे काही ठिकाणी भाजपचे अस्तित्व नाही. राष्ट्रवादी आणि काँग्रेस समोरासमोर लढत आहे.
तर कुठे शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत आहे. त्या ठिकाणी 2 पक्षांसोबत आघाडी करायची,
तिन्ही पक्षांनी आघाडी करायची अथवा स्वबळावर निवडणूक लढवायची हे स्थानिक परिस्थिती
बघून निर्णय होणार असल्याचं नवाब मलिक (Minister Nawab Malik) यांनी सांगितलं आहे

 

पुढे बोलताना मलिक म्हणाले की, ‘महाराष्ट्रात महाविकास आघाडी आहे, पण स्थानिक पातळीवर एकत्र येऊन निवडणूक लढवावी, अशी कोणतीही पक्षाची भूमिका नाही.
स्थानिक पातळीवरील नेते जी भूमिका मांडतील, त्यावरच पुढचा निर्णय घेतला जाईल.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, विशेषतः 14 महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणूक या स्थानिक जिल्ह्यातील परिस्थिती पाहून कोणाबरोबर आघाडी करावी हे निश्चित केलंय,
सरसकट एकच पक्षाबरोबर आघाडी होणार नाही, असं त्यावेळी त्यांनी स्पष्ट केलं आहे.

 

Web Title : Mahavikas Aghadi | so there will be no alliance with shivsena and congress at the local level say navab malik

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime | हॉटेल गारवाचे मालक आखाडेंच्या खूनप्रकरणातील 10 आरोपींविरूध्द मोक्का, आयुक्तांकडून आत्तापर्यंत 42 टोळ्यांवर MCOCA

Rashtra Seva Dal | राष्ट्र सेवा दलाचे डॉ. गणेश देवी आणि कपिल पाटील यांच्यावर गंभीर आरोप

Murder in Shirur | धक्कादायक ! जमीनीच्या वादातून केला सख्ख्या भावाचा खून