पाटील इस्टेटच्या ‘त्या’ झोपडपट्टीवाल्यांना महावितरणचा जबरदस्त ‘शॉक’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – शिवाजीनगर येथील पाटील इस्टेटला लागलेल्या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. ही आग Shortcircateमुळे  लागल्याचे सुरुवातीला सांगण्यात आले होते. पण महावितरणने मात्र आता या प्रकरणात हात वर केले आहेत . महावितरणने या संदर्भात अहवाल सादर केला आहे. या अहवालानुसार पाटील इस्टेटमध्ये लागलेली आग नक्की कोणत्या कारणामुळे लागली आहे हे सांगता येत नाही, असे म्हंटले आहे. महावितरणाच्या या अशा अहवालामुळे  मात्र या घटनेतील नुकसान झालेल्या परिवारांना नुकसान भरपाई मिळण्याकरिता अडचणी येऊ शकतात.

शिवाजीनगर यथील पाटील इस्टेट यथील झोपडपट्टीला २८ नोव्हेंबर रोजी आग लागली होती. या आगीत जवळपास २०० पेक्षा अधिक झोपड्या आगीत भस्मसात झाल्या होत्या. सुदैवाने  या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. त्यावेळेला ही आग एक तर सिलेंडरच्या स्फोटामुळे किंवा शॉर्ट सर्किटमुळे  लागली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. फायर ब्रिगेड आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी ही आग शॉर्ट सर्किटमुळे  लागल्याचे सांगितले होते. नेमकी आग कशामुळे लागली या घटनेचा तपास कारण्याकरीता तहसीलदाराने महावितरणला पत्र पाठवले होते. त्यानंरतर खरेदी यथील महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली आणि अहवाल तहसीलदारांना पाठवला.

काय आहे अहवाल 
या अहवालामध्ये सांगण्यात आले आहे की, या घटनास्थळाचे निरीक्षण केले. घटनास्थळी असलेले इलेक्ट्रॉनिक्स साहित्य आगीत नष्ट  झालेले आढळले. त्यामुळे ही आग शॉर्ट सार्केटमुळेच लागली आहे असा कोणताही पुरावा नाही. त्यामुळे नक्की आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. त्यामुळे पाटील इस्टेटमध्ये मधली ही घटना मात्र कोडेच बनून राहिली आहे.

महावितरणाचा अहवाल आश्चर्यकारक 
आग लागलेल्या जागेचे निरीक्षण केले असता असे आढळून आले की, या झपडपट्टीत एकाच मीटरवर अनेक जणांना वीज पुरवण्यात आली होती . एकाच  मीटरवरून विजेचा जास्तीत जास्त वापर केला जात होता. त्यामुळे शंका उपस्थित होते की , महावितरणाने अशा प्रकारचा अहवाल का दिला ?

यापूर्वी खराडी मध्ये झलेल्या टर्न्सफॉर्मर दुर्घटनेत देखील महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी आपले हात वर केले होते. त्यामुळे या घटनेत मृत्यू झलेल्या दोघा इंजिनिअरच्या परिवारांना मोबदला मिळाला नव्हता . आता या पाटील इस्टेट प्रकरणाचे  देखील असेच काहीसे होईल का? अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे.

आगीचे कारण अस्पष्ट : सी. टी. थोरात 
या प्रकरणाबाबत  महावितरणाचे अधिकारी सी.  टी. थोरात यांनी सांगितले की, “पाटील इस्टेट मध्ये लागलेल्या जागेचे निरीक्षण केल असता कोणताच पुरावा मिळालेला नाही. संबंधित  घरांचा वीजपुरवठा २००९ मध्ये खंडित करण्यात आला होता. अशा परिस्थितीत पुरावा  न मिळाल्याच्या  कारणामुळे ही आग नक्की कशामुळे लागली हे सांगता येणार नाही.