महेंद्रसिंग धोनी करणार क्रिकेटला राम-राम ?

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन

भारताला वन-डे आणि २०-२० क्रिकेट स्पर्धेत विश्वकप जिंकून देणारा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी कसोटी नंतर आता वन-डे प्रकारातून संन्यास घेण्याच्या तयारीत असल्याचे संकेत त्याने एका कृतीमधून दिले आहेत. सध्या सुरु असलेल्या भारत इंग्लंड मालिकेत तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताला पराभव स्वीकारावा लागला. दुसऱ्या सामन्यात संथ खेळामुळे टीकेचा धनी बनलेल्या महेंद्रसिंह धोनीलाही या सामन्यात फारशी चमकदार कामगिरी करता आली नाही.
[amazon_link asins=’B077PWK5BT’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’176f230b-8a7b-11e8-b27d-13f49d62167f’]

इंग्लंडसोबतच्या तिसऱ्या वन-डे क्रिकेट सामन्यात भारताने दिलेले आव्हान इंग्लंडच्या जो रुट आणि इयॉन मॉर्गन या फलंदाजांनी सहज पूर्ण केले. त्यातच तिसरा सामना जिंकल्यानंतर धोनीने एका कृतीमधून आपण वन-डे क्रिकेटला रामराम करणार असल्याचे संकेत दिले असल्याच्या चर्चेला समाजमाध्यमात उधाण आले आहे. धोनीने पंचाकडून चेंडू घेतल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

महेंद्रसिंग धोनीने दुसऱ्या सामन्यात ५९ चेंडूत ३७ धावा केल्या होत्या तर धोनीने तिसऱ्या सामन्यातही केवळ ४२ धावांची खेळी केली. मात्र या खेळीसाठी धोनीने ६६ चेंडू घालवले. सर्वोत्तम फिनीशर अशी ओळख असलेल्या धोनीची बॅट गेले काही दिवस मैदानात शांत आहे.