…तर महेंद्रसिंग धोनी ‘या’ दिवशी घेणार निवृत्ती ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघाच्या सेमीफायनलमधील पराभवानंतर भारतीय संघात मोठे बदल करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. त्याचबराेबर भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या निवृत्तीच्या चर्चा देखील जोर धरत आहेत. मात्र यासंदर्भात बीसीसीआय मोठ्या हालचाली करत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. महेंद्रसिंग धोनी हा वर्ल्डकप स्पर्धेनंतर निवृत्त होईल, असे बोलले जात होते, मात्र अजूनपर्यंत धोनीने याविषयी काहीही भाष्य केलेले नाही. त्यामुळे तो इतक्यात निवृत्ती स्वीकारणार नाही असे वाटत असतानाच बीसीसीआयच्या या गुप्त हालचालींमुळे धोनीच्या चाहत्यांमध्ये नाराजी पसरणार आहे.

जर खरेच धोनी बीसीसीआय आणि निवड समितीच्या या निर्णयानंतर राजीनामा घेणार असेल तर धोनी त्याचा अखेरचा सामना कोणत्या मैदानावर खेळणार याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. त्यामुळे धोनीला जर घरच्या मैदानावर निवृत्ती घ्यायची असेल तर काही काळ वाट पहावी लागणार आहे.

अशा प्रकारे होऊ शकतो त्याचा शेवटचा सामना

पुढील महिन्यात भारतीय संघ विंडीज दौऱ्यावर जाणार असून या दौऱ्यात ३ एकदिवसीय आणि ३ टी -२० सामने खेळणार आहे. त्यामुळे या दौऱ्यात धोनी निवृत्ती स्वीकारण्याची शक्यता कमी आहे. धोनी या दौऱ्यात विश्रांती घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यानंतर मात्र धोनीला निवृत्ती घेण्याची संधी आहे. सप्टेंबर महिन्यात दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौऱ्यावर येत असून या दौऱ्यात आफ्रिकन संघ या दौऱ्यात ३ टी -२० आणि ३ कसोटी सामने खेळणार आहे. त्यामुळे शेवटचा टी -२० सामना खेळून धोनी निवृत्त होऊ शकतो. मात्र याची खात्री देण्यात येत नाही.

घरच्या मैदानावर निवृत्ती घ्यायची झाल्यास

जर धोनीला त्याच्या घरच्या रांचीच्या मैदानावर निवृत्ती घायची असल्यास त्याला डिसेंबरपर्यंत वाट पाहावी लागू शकते. रांचीमध्ये या काळात एकदिवसीय सामना खेळवला जाणार नाही मात्र कटक येथे होणार विंडीजविरुद्धचा सामना रांची येथे हलवून बीसीसीआय त्याला हि संधी उपलब्ध करून देऊ शकते. त्यामुळे आता महेंद्रसिंग धोनी काय निर्णय घेतो याकडे सर्व क्रीडा चाहत्यांचे लक्ष लागून आहे.

आरोग्यविषयक वृत्त

भाजलेल्या ठिकाणी चुकूनही लावू नका ‘या’ गोष्टी

जाणून घ्या गुणकारी आवळ्याचे फायदे

‘हाफकिन’मध्ये किफायतशीर औषधांची होणार निर्मिती

‘ग्रीन टी’ प्रमाणात घ्या… नाहीतर उद्भवू शकतात ‘या’ समस्या

मोडलेल्या हाडावर ‘गरम’ वस्तू टाकल्यास होईल नुकसान ; घ्या काळजी

चॉकलेट वॅक्सचे ‘हे’ फायदे, जाणून घ्या

पोटाची चरबी कमी न होण्याची ‘ही’ ९ मोठी कारणे, त्यासाठी ‘हे’ करा

वजन कमी करण्यासाठी ‘हे’ खाऊ नका

मासिक पाळीच्या दरम्यान विचार पूर्वक निवडा वापरण्यात येणारी साधने

गरोदरपणात ‘हे’ ४ ब्युटी प्रॉडक्ट कधीही वापरू नका