महेश कोठारेंचा नात जिजा आणि सून उर्मिलासोबतचा स्विमिंग पूलमधील फोटो व्हायरल (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेता आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कोठारे ही मराठी फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध जोडी आहे. अनेकदा आदिनाथ आणि उर्मिला काही ना काही कारणाने चर्चेत असतात. उर्मिला अनेकदा सोशल मीडियावर अ‍ॅक्टीव असते. ती नेहमीच आपले फोटो सोशलवर शेअर करत असते. तिचे अनेक फोटो सोशलवर व्हायरल झाले आहेत. परंतु यावेळी मात्र उर्मिलाचे सासरे आणि प्रसिद्ध अभिनेते महेश कोठारे आपल्या नातीसोबतच्या फोटोमुळे चर्चेत आले आहेत.

View this post on Instagram

Having a splash with my granddaughter Jizah

A post shared by Mahesh Kothare (@maheshkothare) on

उर्मिला आणि आदिनाथ यांची मुलगी आणि महेश कोठारे यांची नात जिजा स्विमिंग पूलमध्ये खेळताना दिसत आहे. यावेळी जिजाची आई उर्मिलादेखील तिच्यासोबत दिसत आहे. महेश कोठारे, उर्मिला आणि जिजा स्विमिंग पूलमध्ये पाण्याचा आनंद घेताना दिसत आहेत. उर्मिलाने यावेळचे काही फोटो आपल्या स्टोरीवर शेअर केले आहेत. एक फोटो महेश कोठारे यांनीही इंस्टावर शेअर केला आहे.

असे समजत आहे की, महेश कोठारे आणि जिजा यांचा हा फोटो पुण्यातील एका पंचतारांकित हॉटेलच्या स्विमिंग पूलमधील आहे. नात आणि आजोबा एन्जॉय करताना दिसत आहे.

उर्मिलाने शेअर केलेला फोटो सोशलवर व्हायरल होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही तिचे अनेक फोटो व्हायरल झाले आहेत. उर्मिलाप्रमाणे आदिनाथ कोठारेही सोशलवर नेहमीच सक्रिय असतो.

View this post on Instagram

Getting there… #fitmoms #postspartum #fitness

A post shared by Urmilla Kothare (@urmilakothare) on

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like