Mahesh Landge On Shirur Lok Sabha | भोसरीतून आढळरावांना एक लाखाचे मताधिक्य देण्याची जबाबदारी माझी : महेश लांडगे (Video)

शिरूर : Mahesh Landge On Shirur Lok Sabha | भोसरी विधानसभा मतदारसंघातून (Bhosari Vidhan Sabha) शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांना एक लाखापेक्षा अधिकचे मताधिक्य मिळवून देण्याची जबाबदारी माझी, अशी घोषणाच महेश लांडगे यांनी केली आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारासाठी आयोजित भाजपा पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) देखील उपस्थित होते.(Mahesh Landge On Shirur Lok Sabha)

आमदार महेश लांडगे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची दहा वर्षांची कारकीर्द चांगली असल्यामुळे तिसऱ्यांदा ते पंतप्रधान होणार आहेतच, त्यांचे हात बळकट करण्यासाठी शिरूर लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे (Mahayuti) उमेदवार शिवाजीराव आढळराव यांना विजयी करण्यासाठी आपण सगळे कामाला लागूया.

दरम्यान, या भाजपा पदाधिकारी मेळाव्याला प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह आमदार महेश लांडगे,
महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार राहुल कुल (Rahul Kul),
हडपसरचे माजी आमदार योगेश टिळेकर (Yogesh Tilekar), माजी मंत्री बाळा भेगडे (Bala Bhegade),
जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद (Pradeep Kand), जिल्हा परिषद गटनेत्या आशाताई बुचके
(Ashatai Buchke) आदि उपस्थित होते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Prashant Jagtap On Ajit Pawar | प्रशांत जगतापांची ‘ती’ पोस्ट व्हायरल, सांगा काय चुकल तीचं? भाऊ फितूर झाला, स्वार्थासाठी शत्रूला जाऊन मिळाला…

Junnar Pune Crime | झेंगाट ! लव्ह स्टोरीत तिसऱ्याची ‘एन्ट्री’, कट रचून एकाला गाडीखाली चिरडून मारलं; महिलेसह 2 जणांना अटक, घटना CCTV त कैद (Video)