माहिकी शर्माचं धोनी, विराट आणि जडेजाबात ‘मोठं’ वक्तव्य !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपमधील सेमीफायनल मॅचमध्ये टीम इंडियाचा न्यूझिलंडकडून पराभव झाला. यानंतर आज इंग्लंड आणि न्यझिलंडमध्ये फायनल मॅच सुरु आहे. अशातच ट्रोलर्सपासून ते सर्वच क्रिकेटप्रेमी टीम इंडिया ज्या पद्धतीने खेळली त्याच कौतुक करत आहेत. त्यांना धन्यवाद देत आहे. यानंतर आता अ‍ॅक्ट्रस माहिका शर्माने नुकतीच आपली प्रतिक्रिया दिली आहे.

‘टीम शानदार खेळली परंतु नशीबात काही दुसरेच होते’
वर्ल्ड कप 2019 मधील भारताच्या प्रदर्शनाबाबत बोलताना माहिका म्हणते, “माझ्यासाठी इंडियन क्रिकट टीम जगातील सर्वात चांगली टीम आहे. आपल्या टीममध्ये एकापेक्षा एक टॅलेंटड खेळाडू आहेत मग विषय गोलंदाजीचा असो वा फलंदाजीचा. फलंदाजीमध्ये विराट कोहली आहे जो जगात एक नंबर फलंदाज आहे. तर दुसरीकडे जसप्रीत बुमराह आहे जो जगातील सर्वात उत्तम वेगवान गोलंदाज आहे. आपल्या पूर्ण टीमेने शानदार खेळी केली. परंतु नशीबात काही दुसरेच होते.”

https://www.instagram.com/p/By9VCfap2jT/?utm_source=ig_embed

‘माही हॉट… तर रवींद्र जडेजा माझा क्रश’
याशिवाय कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीबाबत आणि रवींद्र जडेजाबाबत बोलताना माहिका शर्मा म्हणाली, “टीमच्या खेळाडूंबद्दल बोलायचे झाले तर, मी माही म्हणजेच महेंद्रसिंग धोनीची खूप मोठी फॅन आहे. धोनीची खेळी जेवढी कमाल आहे आणि मैदानात तो जितका कूल दिसतो परंतु खरोखर तो खूपच हॉट आहे. इंडियन टीममध्ये आपल्या क्रशबद्दल बोलायचे झाले तर, एकच खेळाडू आहे तो म्हणजे रवींद्र जडेजा. सेमी फायनलमधील त्याच्या सादरीकरणानंतर मी त्याची आणखी मोठी फॅन झाले आहे.”

https://www.instagram.com/p/ByzGMooJoaF/?utm_source=ig_embed

‘मला सर्व खेळाडूंना सिक्रेट पार्टी द्यायची आहे’
माहिका पुढे बोलताना म्हणाली की, “आपली टीम फायनल जिंकली असती तर खूप चांगलं झालं असतं. परंतु आताही मला आपल्या खेळाडूंबद्दल काही तक्रार नाही. ते आधीही आमचे हिरो होते आणि आताही आहेत. मला सर्व खेळाडूंना चिल करण्यासाठी सिक्रेट पार्टी द्यायची आहे. मी लवकरच माझ्या हिरोंना मोठं सरप्राईज देणार आहे.”

https://www.instagram.com/p/ByxLcMPJHY7/?utm_source=ig_embed

‘याआधीही राहुल गांधींना घेऊन माहिक चर्चेत’
याआधी माहिका शर्मा काँग्रेसचे राहुल गांधींप्रति प्रेम व्यक्त केल्याने चर्चेत आली होती. राहुल गांधींनी काँग्रेस पदाचा राजीनामा दिल्यानंतर तिने त्यांचे समर्थनही केले होते. याशिवाय राहुल गांधी यांच्या लोकसभा निवडणुकीतील विजयासाठी तिने व्रतही केलं होते.

https://www.instagram.com/p/BwHHPsLpTrX/

माहिका आपल्या बोल्डनेस आणि वक्तव्यांमुळे नेहमीच लाईमलाईटमध्ये असते. याआधीही माहिका शर्माने शाहिद आफ्रिदी आणि विंग कमांडर अभिनंदन यांना घेऊन बोल्ड आणि बिंधास्त वक्तव्ये केली आहेत.

https://www.instagram.com/p/BudwQJMhcin/

दात मजबुत आणि पांढरे शुभ्र राहण्यासाठी ‘या’ ८ पदार्थांचं सेवन नक्‍की टाळा

वजन कमी करण्याचे ‘हे’ १५ रामबाण उपाय, घाम देखील येणार नाही

स्तनाच्या कर्करोगाची ‘ही’ ६ लक्षणं, जाणवल्यास ‘हे’ ४ उपाय तात्काळ करा, जाणून घ्या

गुलाबाच्या फुलाचे अशाप्रकारे सेवन ‘या’ आजारांसाठी उपयुक्‍त, जाणून घ्या

‘हे’ उपाय केल्यास ‘गॅस्ट्रिक ट्रबल’मध्ये त्वरित मिळेल आराम, औषध घेण्याची गरज नाही

पांढरे केस पुन्हा काळे करायचे आहेत मग ‘या’ १३ पैकी कोणताही एक उपाय कराच

विज्ञान आणि आयुर्वेद सांगतं ‘या’ पदार्थाने करा जेवणाची सुरूवात, ‘हे’ फायदे होतात