गर्भनिरोधक गोळ्या खाल्ल्याने महिलांच्या शरीराचे होते ‘हे’ 9 प्रकारचे नुकसान !, जाणून घ्या

बाजारात अनेक प्रकारच्या कॉन्ट्रॅसेप्टिव्ह पिल्स मिळतात, ज्या असुरक्षित शरीरसंबंध ठेवल्यानंतर 72 तासांच्या आत महिलांना खाव्या लागतात. यामुळे नको असलेला गर्भ राहण्याची शक्यता खुप कमी होते. परंतु, या गोळी सतत सेवन केल्याने अनेक साईडइफेक्ट्स सुद्धा होतात.

हे आहेत साईडइफेक्ट्स

1 कॉन्ट्रॅसेप्टिव्ह पिल्स 0.75 MG Tablet खाल्ल्याने अनेक महिलांना श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.

2 अनेक प्रकारात महिलांना ओठ, चेहरा, पापण्या, जीभ, हात आणि पायाला सूज आल्याचे जाणवू शकते.

3 ही गोळी खाल्ल्याने महिलांमध्ये पोटदुखीची समस्या वाढू शकते.

4 ज्या मुली गर्भनिरोधक गोळ्यांचे सेवन करतात, त्यांच्यामध्ये मासिकपाळी दरम्यान त्रास आणि हेवी ब्लीडिंगची समस्या होऊ शकते.

5 अनेक मुलींमध्ये मासिकपाळीच्या तारखेत बदल होऊ शकतो.

6 अनेकदा गर्भनिरोधक गोळी घेतल्याने महिलांना चक्कर आणि उलटीसारख्या समस्या होतात.

7 गर्भनिरोधक गोळ्या सेवन केल्याने काही महिलांना थकवा आणि कमजोरी जाणवते.

8 काही महिलांमध्ये हार्मोन्समध्ये बदल होतो.

9 तर काही महिलांना स्तनांमध्ये वेदना, कठिणपण जाणवतो.