मुंबईतील ‘या’ बड्या नेत्यांच्या राजकीय दहीहंड्या रद्द, पुरग्रस्तांना करणार मदत

मुंबई : पोलिसनामा ऑनलाइन – तरुणाईच्या आवडीचा उत्सव असलेल्या दहीहंडी बाबत महत्वाची बातमी आहे. मुबईतील दहीहंडी पथकांनी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. नुकतीच राज्यात उद्भवलेली पूरग्रस्त परिस्थिती लक्षात घेता दहीहंडी न करून त्याचा खर्च पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पाठवण्यात येणार आहे.

भाजप नेते राम कदम यांची घाटकोपरमधील दहीहंडी, सचिन अहिर यांची वरळीमधील दहीहंडी तसेच प्रकाश सुर्वे यांच्या पुढाकाराने होणारी दहीहंडी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आणि दहीहंडीची ही रक्कम पूरग्रस्तांसाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईमध्ये छोट्या मोठ्या अशा कमीतकमी ३ हजार दहीहंड्या होतात आणि यातील महत्वाच्या दहीहंड्यांचा खर्च हा करोडो रुपयांच्या घरात असतो त्यामुळे दहीहंडी मंडळांनी एकत्रितपणे हा निर्णय घेतला आहे.

या वर्षी होणार नाहीत या दहीहंड्या –

1) राम कदम यांची घाटकोपरमधील दहीहंडी
2) आमदार प्रकाश सुर्वे यांची दहीहंडी
3) सचिन अहिर यांची वरळीतील दहीहंडी

तसेच अनेक मंडळांनी पारंपरिक पद्धतीने दहीहंडी साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. अनावश्यक खर्च टाळून ती रक्कम पुरग्रस्तांच्या मदतीसाठी देण्यात येणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त –