‘या’ वयातही मलायका अरोरा एकदम ‘कडक’, लेटेस्ट फोटो व्हायरल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री मलायका अरोरा आपल्या स्टाईल आणि स्टेटमेंटसाठी ओळखली जाते. चाहत्यांमध्ये कायमच चर्चेत असणारी मलायका सोशल मीडियावर मात्र नेहमीच सक्रिय असते. आपल्या आयुष्यात काय चाललंय हे नेहमीच ती आपल्या चाहत्यांना सोशलवरून सांगत असते. अनेकदा ती फोटो, व्हिडीओ चाहत्यांसाठी शेअर करत असते. कधी ती आपल्या फोटोंमुळे ट्रोलही होत असते. कधी तिच्या फोटोंनी चाहते पागल होऊन जातात. नुकतंच आपल्या फोटोंमुळे मलायकाने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

मलायकाने तिचे काही लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. यात मलायका पिंक कलरच्या आउटफिटमध्ये दिसत आहे. मलायकाचा हा अंदाज पाहण्यासारखा आहे. सर्वांना माहितीच आहे की, मलायका फिटनेस फ्रीक आहे. स्वत:ला फिट ठेवण्यासाठी आणि फिगर मेंटेन करण्यासाठी मलायका जीममध्ये प्रचंड मेहनत घेते. त्यामुळे चाहतेही मलायकाच्या फोटोंनी घायाळ होत असतात. आताही मलायकाच्या या आउटफिटमधील फिगरचं चाहत्यांनी भरपूर कौतुक केलं आहे.

मलायकाचे इंस्टाग्रामवर तब्बल 92 लाख फॉलोवर्स आहेत. मलायका जितकी लोकप्रिय आहे तितकंच कधी कधी तिला लोकांच्या नकारात्मक प्रतिक्रियेचा किंवा रोषाचा सामना करावा लागतो. कधी तिच्या रिलेशनशिपमुळे तर कधी अर्जुन आणि तिच्यातील वयाच्या अंतरामुळे तर कधी तर आउटफिटवरून लोक तिला ट्रोल करतात. परंतु मलायकाला याने काही फरक पडत नसल्याचे ती सांगते.

visit : Policenama.com