Malaika Arora | खान कुटुंबाबद्दल मलायका अरोराचे मोठे वक्तव्य; म्हणाली….

पोलीसनामा ऑनलाइन टीम – सध्या अभिनेत्री आणि मॉडेल मलायका अरोरा (Malaika Arora) तिच्या ‘मुव्हिंग इन विथ मलायका’ या शोमुळे चर्चेत आहे. तिने या शोमध्ये तिच्या खासगी आयुष्यातील बऱ्याच गोष्टींचा खुलासा केला आहे. तिच्या या खुलासाने प्रेक्षक चकित झाले आहेत. तर या शोमध्ये तिचा बोल्ड आणि बिंदास अंदाज देखील पहायला मिळत आहे. पुन्हा एकदा तिने या शोमध्ये तिचा पूर्वाश्रमीचा पती अरबाज खान याच्या कुटुंबाविषयी वक्तव्य केले आहे. (Malaika Arora)

यावेळी शोमध्ये करण जोहरशी बोलताना मलायका (Malaika Arora) म्हणाली होती की, “मी अरबाजच्या कुटुंबात कधीही नंबर वन नाही येऊ शकले. त्यांच्या यादीत मी पहिल्या स्थानी कधीच येऊ शकत नाही. मात्र माझा मुलगा अरहानमुळे त्यांना माझी काळजी वाटते. हे करणं देखील योग्य आहे”. तिच्या या बोलण्यानंतर करण तिला बोलतो, “परंतु तुझ्या अपघातानंतर संपूर्ण खान कुटुंब तिथे उपस्थित होते. ते आम्ही सगळ्यांनी पहिले आहे. खरं तर काही लोक कायमच आपल्या सोबत असतात”. मलायकाच्या या वक्तव्याने पुन्हा एकदा वादाची ठिणगी पेटल्याचे दिसत आहे.

तर मलायका आणि अरबाज खान यांनी 1998 साली लग्न बंधनात अडकले होते.
तर त्यांनी 2016 मध्ये घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आणि 2017 मध्ये कायदेशीर रित्या ते विभक्त झाले.
मात्र मुलगा अरहानसाठी मलायका आणि अरबाज अनेकदा एकत्र दिसतात.
सध्या मलायका अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे. तर अरबाज खान मॉडेल जॉर्जिया अँड्रियानीबरोबर रिलेशनशिपमध्ये आहे.

 

Web Title :- Malaika Arora | malaika arora says she is not number one for arbaaz khan family talks in her show

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune CP Retesh Kumaarr | रितेश कुमार यांनी स्विकारली पुणे पोलिस आयुक्तपदाची सूत्रे (VIDEO)

Sanjay Raut | “कुणालाही हे मान्य नाही की राजभवनात बसून…”, संजय राऊतांची राज्यपालांवर टीका

Governor Appointed MLA | राज्यपाल नियुक्त आमदारांची सुनावणी लांबणीवर, विधानपरिषद सभापतीपदाच्या निवडणुकीत ट्विस्ट