अभिनेत्री मलायका अरोरानं ट्रोलर्सला दिलं ‘सडेतोड’ उत्तर !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडची अभिनेत्री मलायका अरोरा आपल्या फिटनेस आणि बोल्ड फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असते. या वयातही ती खूप फिट आहे. बऱ्याचदा ती बिकीनी किंवा बोल्ड अवतारातील फोटो शेअर करत असते. यावेळी तिला ट्रोलर्सचा सामना करावा लागतो. परंतु मलायकानं आता ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलं आहे.

एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत बोलताना मलायका म्हणाली, “मला ट्रोलिंगनं काहीही फरक पडत नाही. ट्रोलिंग वगैरे खूप दु:खद आहे. मला वाटतं की, सोशल मीडिया खूप निगेटीव स्पेस बनत आहे आणि हे खूप दु:खद आहे. कोणालाच आपल्या दिवसाचा शेवट निगेटीव नको असतो. मला वाटतं की, आपण पॉजिटीव्हिटी आणि हॅप्पीनेस पसरवायला हवा. लोगों का काम ही है कहना. त्यामुळे मला काहीही फरक पडत नाही. लोकं तर नावंच ठेवतात. मी प्रत्येकाला नाही बोलू शकत. लोक बोलतील तर त्यांना बोलू द्या.”

फिटनेस आणि फॅशनवर बोलताना मलायका म्हणते, “जेव्हा कोणी मला फिटनेस आणि फॅशन इंस्पिरेशन म्हणतं तेव्हा एक प्रेशन जाणवायला लागतो. मला कॉम्प्लिमेंट आवडतात. परंतु असे टॅग्स अनेक जबाबदाऱ्या घेऊन येतात. लोकांची दिशाभूल होऊ नये यासाठी मी नेहमी जे काही म्हणते आणि जे काही करते तेव्हा माझा नेहमी प्रयत्न असतो की, त्यात माझी जबाबदारीची भावना असावी.”

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/