‘300 रुपये द्या आणि आवडत्या बॉलिवूड स्टारला भेटा’ ; अर्जुन कपूरची बहिण अंशुलाचा नवा बिजनेस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार अर्जुन कपूरची बहिण अंशुला कपूरने एक चॅरिटी बिजनेस सुरु केला आहे. फॅनकाईंड असं या बिजनेसचं नाव आहे. यामध्ये तिने एक असा प्लॅटफॉर्म आणला आहे की, ज्यामुळे ऑनलाईन पैसे एकत्र केले जाऊ शकतात. 300 रुपयांच्या तिकिटावर सेलिब्रिटी आणि चाहत्यांना भेटवण्याचा तिचा विचार आहे.

विविध चॅरीटीला सर्मथन देण्यासोबत त्यांच्यासाठी पैसे एकत्र करणे आणि चाहत्यांना त्यांच्या आवडत्या सेलेब्रिटी सोबत अनेक प्रकारच्या मजेदार अ‍ॅक्टीविटींचा अनुभव घेण्याची संधी यात देण्यात येणार आहे. जसे की, पेंटबॉल खेळणं बेकिंग आणि क्रिकेट खेळणं. यासाठी तिने वेबसाईट लाँच केली आहे.

खरं तर, चाहत्यांना या वेबसाइटवर त्यांच्या आवडत्या स्टार्सच्या तपशिलासह तीनशे रुपये जमा करावे लागतील आणि त्यानंतर अंशुला आणि त्याची टीम लकी ड्रॉच्या माध्यमातून एखादा चाहता निवडेल आणि हा चाहता आपल्या आवडत्या स्टार्ससोबत संपूर्ण दिवस घालवू शकेल.

अंशुला म्हणाली की, “फॅनकाईंडचा हेतू सरळ आहे. देशातील अनके चॅरिटीसाठी धन एकत्रित करत चाहत्यांनाही त्यांच्या आयुष्यातील काही खास अनुभव देऊन त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणं.”

आपल्या बहिणीच्या या कमावर अर्जुन कपूरने टिप्पणी केली आहे. आपल्या पोस्टमध्यो तो म्हणतो की, “मला तुझ्यावर गर्व आहे. माझ्या जीवनात तू मला नेहमीच प्रेरीत करत असते.”

आरोग्यविषयक वृत्त –