मालदिवला ‘या’ पध्दतीनं मदत करत भारताचा पाकिस्तानला मोठा दणका

पोलीसनामा ऑनलाइन टीम – पारंपारिक शत्रू असलेल्या पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय राजकारणात भारताने जोरदार धक्का दिला आहे. मालदिवचे (maldives) परराष्ट्र मंत्री अब्दुल्ला शाहिद संयुक्त राष्ट्राच्या महासभेच्या (United Nations General Assembly ) अध्यक्षपदी निवडून आले आहेत. शाहिद UNGA चे 76 वे अध्यक्ष ठरले आहेत. मालदिवसमोर (maldives) अफगाणिस्तानचे आव्हान होते. मात्र 143 विरुध्द 48 मतांनी मालदिवचा विजय झाला. येत्या सप्टेंबरपासून ते पदाचा कार्यभार स्वीकारतील. यामुळे भारताला दिलासा मोठा मिळाला आहे. तर पाकिस्तानला झटका बसला आहे. मालदिवने (maldives) वर्षभरापूर्वी महासभेच्या अध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर केला होता. तेंव्हापासून भारताने मालदिवला प्रचारात मोलाची मदत केली. त्यामुळे मालदिवच्या विजयात भारताचा अप्रत्यक्ष हात आहे.

UNGA चे अध्यक्षपद सध्या वोल्कन बोज्किर यांच्याकडे आहे.
काही दिवसांपूर्वीच वोल्कन यांनी काश्मीर मुद्द्यावरून पाकिस्तानच्या भूमिकेचे समर्थन केले होते. काश्मीरचा मुद्दा UNGA मध्ये उपस्थित करण्याचा सल्ला वोल्कन यांनी पाकिस्तानला दिला होता. त्यावरून भारताने वोल्कन यांच्यावर तोफ डागली होती.
UNGA अध्यक्षांनी अशी भूमिका घेणे योग्य नाही, ते त्यांच्या पदाला शोभणारे नसल्याचे खडे बोल भारतानने वोल्कन यांना सुनावले होते.
UNGA च्या अध्यक्षपदाची सुत्रे अब्दुला यांच्याकडे येत्या सप्टेंबरपासून येणार आहेत.
शाहिद यांची निवड होताच भारताने त्यांचे अभिनंदन केले आहे.
भारत आणि मालदिवचे संबंध अतिशय उत्तम आहेत.
त्यामुळेच संयुक्त राष्ट्रात भारताने मालदिवला मदत केली आहे.
यानंतर आता मालदिव संयुक्त राष्ट्रातील भारताचे उपस्थायी प्रतिनिधी नागराज नायडू यांना शाहिद यांचे खासगी सचिव म्हणून नियुक्तीची शक्यता आहे.
त्यासाठी मालदिव भारताशी चर्चा करत असल्याचे वृत्त समोर आले आहे.

Also Read This : 

IBPS RRB PO/Clerk Notification 2021 | बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्णसंधी ! 10466 पदांसाठी भरती, जाणून घ्या प्रक्रिया

 

Bribery | लाचखोरीच्या आरोपावरून पोलिस उपनिरीक्षकासह चौघे तडकाफडकी निलंबीत