जिल्हा महिला व बालविकास अधिकारी माने यांना मल्हाररत्न पुरस्कार

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – राजे मल्हारराव होळकर सामाजिक प्रतिष्ठान बीड आयोजित सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या जयंतीनिमित्त दिला जाणारा मानाचा राज्यस्तरीय पुरस्कार बीड येथे राज्यस्तरीय मल्हाररत्न पुरस्कार २०१९ नगर येथील जिल्हा हा महिला व बालविकास अधिकारी विजयमाला मानेेेे-खरात यांना प्रदान करण्यात आला आहे.

पुरस्कार वितरण सोहळा महाराष्ट्र राज्याचे मंत्री माननीय नामदार जयदत्त क्षीरसागर, विधान परिषद सदस्य आ. रामराव वडकुते, महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलचे सदस्य माननीय अँड अण्णाराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. आज सकाळी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, बीड येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल जिल्हा महिला व बालविकास अधिकारी माने यांना सदर पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

वंचित वर्गातील मुले, महिला यांच्यासाठी शासकीय सेवेत असूनही चांगले कार्य केल्याबद्दल संस्थेच्यावतीने हा गौरव करण्यात आला आहे. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

आरोग्यविषयक वृत्त