अमेरिकेत ‘बिल गेट्स’सोबत दिसली ‘मर्डर गर्ल’ मल्लिका शेरावत, फोटो व्हायरल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडमध्ये मर्डर गर्ल म्हणून फेमस असणारी अभिनेत्री मल्लिका शेरावत सध्या सिनेमांपासून दूर आहे. मल्लिका सिनेमांमध्ये जास्त सक्रिय नसली तरी ती सोशलवर मात्र सक्रिय असते. नुकताच तिचा एक फोटो समोर आला जो सध्या व्हायरल होताना दिसत आहे. या फोटोत मल्लिका बिल गेट्स यांच्यासोबत दिसत आहे.

मल्लिकानं बिल गेट्स यांच्यासोबतचा फोटो सोशलवर शेअर केला आहे. फोटो शेअर करताना मल्लिका म्हणते, “बिल गेट्स यांच्यासोबत फीमेल एम्पावरमेंटबाबत चर्चा झाली. मी त्यांच्याकडून खूप प्रेरीत आहे.”

https://www.instagram.com/p/B75BVzFJDMR/

मल्लिकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर सध्या ती सिनेमांपासून दूर आहे. एकता कपूरची वेब सीरीज सबकी फटेगी मध्ये मल्लिका शेवटची दिसली होती. या सीरीजमधून मल्लिकानं तिचा डिजिटल डेब्यू केला होता. या सीरिमध्ये तिच्यासोबत तुषार कपूर, कृष्णा अभिषेक, कीकू शारदा, शेफाली जरीवाला, साक्षी प्रधान, श्वेता गुलाटी, अनिल चरणजीत आणि संजय मिश्रा यांसारखे स्टार होते. काही दिवसांपूर्वीच ती बिग बॉसमध्ये आली होती. सलमान सोबत तिनं खूप मस्ती केली.