पोलीस आयुक्तांना सीबीआयसमोर हजर राहण्याचे आदेश

दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन – सीबीआय आणि कोलकत्ता सरकामध्ये रंगलेल्या नाट्यात सर्वोच्च न्यायालयाने पोलीस आयुक्त राजीव कुमार यांना सीबीआयसमोर चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. तसेच सीबीआयने त्यांना अटक करू नये मात्र राजीव कुमार यांनी तपासात सहकार्य करावे असेही सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे.

शारदा चीटफंड गैरव्यवहारप्रकऱणी चौकशी करण्यासाठी पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्याकडे सीबीआय अधिकारी गेल्यानतंर त्यांनाच पोलिसीना गाडीत कोंबून ठेवले होते. या नाट्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी विरुद्ध केंद्र सरकार असे नाट्य रविवारी रंगले होते. त्यानंतर ममतांनी धरणे आंदोलनासही सुरुवात केली आहे. तर शारदा चिटफंड घोटाळ्यातील इलेक्ट्रॉनिक पुरावे राजीव कुमार यांनी नष्ट केल्याचा आरोप सीबीआयने केला आहे.

याप्रकऱणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल कऱण्यात आली होती. याचिकेवर मंगळवारी तातडीने सुनावणी घेण्याचे सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने मान्य केले. त्यांनी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट झाले तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल असेल, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्यानंतर मंगळवारी सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्यायमुर्ती संजीव खन्ना यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यावेळी पोलीस आयुक्त राजीव कुमार यांनी सीबीआयसमोर चौकशीसाठी हजर राहावे. तसेच त्यांनी तपासात सहकार्य करावे. सीबीआय त्यांना अटक करणार नाही. असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.