PM मोदींचा स्क्रू ढिल्ला, विकासदर घसरत चाललाय तर त्यांची दाढी वाढतेय : ममता बॅनर्जी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या पश्चिम बंगालमध्ये उद्या पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. त्याआधी पक्षांमध्ये राजकीय कलह वाढला आहे. आज मुख्यमंत्री आणि तृणमूल कॉंग्रेसच्या सुप्रीमो ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदींविषयी वादग्रस्त विधान केले आहे. एका मोर्चाला संबोधित करताना पंतप्रधान मोदींचा स्क्रू ढिल्ला असल्याचे त्यांनी म्हटले.

ममता बॅनर्जी म्हणाल्या, “औद्योगिक विकास रखडला आहे. केवळ त्यांची (पंतप्रधान नरेंद्र मोदी) दाढी वाढत आहे. कधी ते स्वत: ला स्वामी विवेकानंद म्हणतात, तर कधी त्यांच्या नावावरून स्टेडियमचे नाव बदलले जाते. त्यांच्या मेेंंदूूत काहीतरी गडबड आहे. त्यांचा स्क्रू ढिल्ला असल्यासारखे दिसते आहे.”

योगी आदित्यनाथ यांनी काल दीदीवर केला हल्लाबोल…
भारतीय जनता पक्षाचे स्टार प्रचारक आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधत म्हटले, की भगवान रामाला चिडणारी ‘दीदी’ भारतीय संस्कृतीची ओळख असणाऱ्या भगवा कपड्याला घाबरत आहे. गुरुवारी बॅनर्जी यांच्या मतदारसंघातील नंदीग्राम सोडून मेदिनी पुर आणि चंद्रकोना येथे तीन स्वतंत्र मोर्चाला संबोधित करताना योगी म्हणाले, की २ मे नंतर टीएमसीच्या गुंडांचा हिशोब केला जाईल. ज्यांना शोधून कायद्यानुसार शिक्षा केली जाईल.

ते म्हणाले, की भारतीय संस्कृतीची ओळख असणाऱ्या या भगव्या कपड्याला दिदी घाबरत आहे. त्यांनी ममता सरकारवर तुफानग्रस्तांच्या मदतीसाठी केंद्र सरकारने पाठविलेले पैसे हडप केल्याचा आरोप केला आणि टीएमसीच्या टोलबाजांनी केंद्रातून गरीब पीडितांसाठी पाठविलेले पैसे देखील खाल्ले. मुख्यमंत्री म्हणाले, “ममता दीदी यांना भगवान रामवर चिड आहे. जय श्री राम घोषणा देण्यास त्या परवानगी देत ​​नाही. मी भगवान राम आणि कृष्ण यांच्या धरतीवरून रामकृष्ण परमहंसांच्या या धरतीवर आलो आहे. ”

योगी उपस्थित लोकांना म्हणाले, “तुम्ही ममता बॅनर्जी यांना दहा वर्षांचा हिशोब विचारला पाहिजे. त्यांंना विचारलं पाहिजे की उत्तर प्रदेशात जेव्हा दुगार्पूजा होऊ शकते तेव्हा ते बंगालमध्ये का होऊ शकत नाही. आज दहा वर्षांपूर्वी नंदीग्राममध्ये कम्युनिस्टांनी किती काम केले होते, आज मी त्या हुतात्म्यांच्या कुटुंबीयांना भेटलो, दीदींना त्या हुतात्म्यांशी काहीच रस नाही, जेेव्हा त्यांच्याकडून त्यांना सत्ता मिळाली आहे. ”