पुणे विद्यापीठात नोकरी देण्याच्या अमिषाने लुटणारा भामटा जेरबंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात क्लार्कची नोकरी लावण्याचे अमिष दाखवून ७ लाख रुपये लुबाडणाऱ्या दोन भामट्यांपैकी एकाला खडक पोलिसांनी अटक केली. भारत शिवाजी खेडकर असे अटक करण्यात आलेल्या भामट्याचे नाव आहे. तर त्याचा साथीदार भाऊ यशवंत शिवाजी खेडकर फरार आहे. हि कारवाई बारामती येथील चौधरवस्ती येथे करण्यात आली.

सुलभा अरुण बनसोडे (वय-६० रा. गुरुवार पेठ, पुणे) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. आरोपींनी त्यांच्या मुलाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात क्लार्कची नोकरी लावून देतो असे सांगून त्यांच्याकडून सात लाख रुपये घेतले. पैसे घेतल्यानंतर दोघेही फरार झाले होते. या गुन्हयातील आरोपी भरत खेडकर हा बारामती येथील चौधरवस्ती येथे आला असल्याची माहिती पोलीस कॉन्स्टेबल महावीर दावणे, आशिष चव्हाण यांना समजली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून अटक केली.

आरोपी भारत खेडकर याने भावाच्या मदतीने पुणे शहरातील खडक, विश्रामबाग, डेक्कन, वेळापूर, सांगोला, सोलापूर येथील अनेक लोकांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात नोकरी लावण्याचे आमिष दाखून लाखो रुपयांची फसवणूक केली आहे.

हि कारवाई पश्चिम प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त श्रीकांत तरवडे, परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे, फरासखाना विभागाचे सहायक पोलीस आयुक्त प्रदिप आफळे यांच्या मार्गदर्शनाखाली खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव, पोलीस निरिक्षक गुन्हे उत्तम चक्रे, तपास पथकाचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक उमाजी राठोड, महिला पोलीस उपनिरीक्षक कल्याणी पाडोळे, पोलीस कर्मचारी विनोद जाधव, गणेश सातपुते, संदिप पाटील, महावीर दावणे, आशिष चव्हाण, इम्रान नदाफ, राकेश क्षिरसागर, समीर माळवदकर, बंटी कांबळे, प्रमोद नेवसे, रवी लोखंडे, योगेश जाधव, विशाल जाधव, हिम्मत होळकर यांच्या पथकाने केली.

आरोग्यविषयक वृत्त