3 महिन्यांपर्यंत Potty न झाल्याने व्यक्तीचा मृत्यू, पोटात तयार झाला होता मोठा भयंकर ‘गोळा’

नवी दिल्ली : वृत्त संस्था – 2021 मध्ये एप्रिल महिना बॉवल कॅन्सरसाठी जागरूकता करण्यासाठी डेडिकेट करण्यात आला आहे. सोशल मीडियावर जाझमीन डोनोवन नावाच्या महिलेने आपल्या बॉयफ्रेंडची स्टोरी लोकांसोबत शेयर केली आहे. जेमिनचा प्रियकर नाथन प्रिचर्ड याचा मृत्यू मागच्या वर्षी पोटाच्या कॅन्सरने झाला होता. जेमिनने सांगितले की, अशा प्रकारे दोघांसह डॉक्टर सुद्धा या आजाराला पोटदुखी समजत राहीले. कॅन्सरचे निदान तेव्हा झाले जेव्हा जीव वाचवणे अशक्य झाले होते.

तीन महिन्यांपर्यंत गेला नव्हता पॉटीसाठी
जेमिनने सांगितले की नाथनला पोटदुखीची समस्या होत असे. या दरम्यान तो नॉर्मल कॉन्स्टिपेशनचे औषध घेत राहिला. अगोदर त्याला थोडा आराम मिळत होता परंतु नंतर लागोपाठ तीन महिन्यापर्यंत नाथनला पॉटीच झाली नाही. जेव्हा तो डॉक्टरांकडे जायचा त्यास कॉन्स्टिपेशनचे औषध देऊन पाठवले जात असे.

पोटात झाला होता ट्यूमर
तीन महिन्यांपर्यत लागोपाठ पॉटी न झाल्याने नाथनची स्थिती खुप खराब झाली होती. त्याचे वजन वेगाने कमी होऊ लागले होते. यानंतर जेव्हा स्कॅन करण्यात आले तेव्हा समजले की, पोटात ट्यूमर पॉटीला रोखत होता. हा ट्यूमर नॉर्मल तपासणीत दिसून आला नाही, ज्याचा परिणाम असा झाला की, नाथनला बॉवल कॅन्सर झाला.

ही आहेत कॅन्सरची लक्षणे
बॉवल कॅन्सरची लक्षणे अगोदर कॉन्स्टिपेशन सारखीच असतात. परंतु नंतर ती भीषण रूप घेतात. यामध्ये पोटाच्या आत ब्लिडिंग होऊ लागते. सोबतच पॉटी होत नाही. वजन सुद्धा वेगाने कमी होत जाते. व्यक्तीला नेहमी थकवा आणि आजारी असल्यासारखे जाणवते. पोटात मुरडण्याची समस्या याचे सामान्य लक्षण आहे. आता नाथनची प्रेयसी आणि कुटुंबिय लोकांना या कॅन्सरबाबत लोकांना जागरूक करत आहेत.