किळसवाणे ! आॅर्डर केले जेवण, भेटली अंडरवियर

वृत्तसंस्था : सध्याचं जीवन इतकं धावपळीचं आणि धकाधकीचं आहे की, लोकांना स्वत:साठी अजिबातच वेळ नाही. शिवाय लोकांना सगळं काही घर बसल्या हवं असतं. यामुळे लोक आॅनलाईन खरेदीला जास्त प्राधान्य देतात. यासाठी अनेक वेगवेगळे अॅप आपल्याला पाहायला मिळतात. आॅनलाईन खरेदी दिवसेंदिवस वाढत आहे तसेच फसवणूकीचे प्रकारही वाढत आहेत. अनेकदा आपण आॅर्डर करतो एक आणि डिलिव्हरी होते काही आैरच गोष्टीची अशीच एक घटना समोर आली आहे. अशी घटना नक्कीच कोणासोबत घडली नसेल. एका माणसाने जेवण आॅर्डर केलं आणि त्याला मिळाली अंडरवियर.

ही उबर डिलिवरी ‘उबर इट्स’ ने केली आहे. फ्लोरीडातील ही घटना आहे. एका व्यक्तीने एका जपानी रेस्टॉरन्टमधून जेवण ऑर्डर केलं होतं. उबर इट्सने या जेवणाची डिलिव्हरी दिली. यानंतर या व्यक्तीने  पैसे देऊन जेवण घेतलं. जेवणाची आलेलं पार्सल घेऊन लियो आत रुममध्ये गेला. पॅकेट उघताना त्याला त्यावर एक पांढरा कपडा दिसला. त्याला सुरुवातील वाटलं की, ही एखादी फॅन्सी नॅपकिन असेल. पण जेव्हा त्याने पॅकिंग पूर्णपणे काढलं तेव्हा त्याला एक घाणेरडी अंडरविअर दिसली. लियाे असं या व्यक्तीचं नाव आहे असं समजत  आहे.

या प्रकाराने लियो पुरता गोंधळून गेला. या गोष्टीचा त्याला प्रचंड राग आला. यानंतर त्याने तात्काळ जपानी रेस्टॉरन्ट आणि पोलिसांना फोन केला आणि घडलेला सर्व प्रकार कथन केला. सर्वांनाच या घटनेने धक्का बसला. पण सर्वांनी सांगितले की, ते याप्रकरणी काहीच करु शकत नाहीत. यानंतर संतापलेल्या लियोने ती अंडवियर त्याच डब्यात टाकून दिली.
समोर आलेल्या माहितीनुसार, उबर प्रवक्ता म्हणाले की, “जे काही झालं ते चुकीचं झालं. आम्ही त्या लोकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहोत, जे या ऑर्डरला जबाबदार आहे. जेणेकरुन याची चौकशी व्हावी.”