‘वाचवा…नाही तर तो मारुन टाकेन’ : ‘त्या’ अत्याचारीत बालिकेचा बचावासाठी ‘टाहो’

जळगाव : पोलीसनामा ऑनलाईन – चोपडा तालुक्यातील वैजापूर येथे मंगळवारी सायंकाळी साडे सात वाजता देवेंद्र राजेंद्र भोई (२२, रा.वैजापूर) याने एका सहा वर्षीय आदिवासी अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे समोर आले आहे. तर दुसऱ्या चुलत बहिणीवरही अत्याचाराचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. दरम्यान, तिसरी मुलगी तेथून पळून गेल्याने ती बचावली आहे. संशयित देवेंद्र भोई याला मध्यरात्री दीड वाजता पोलिसांनी अटक केली आहे. दोन सख्या बहिणी व एक त्यांची मैत्रिण अशा तिघं जण गावाबाहेर शौचास गेल्या असता देवेंद्र याने ही संधी साधून त्यांच्यावर अत्याचार केले. त्यात एका बालिकेची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

वाचवा, नाही तर तो मारुन टाकेन !
रस्त्याने दुचाकीने जात असलेल्या गावातीलच दाम्पत्याला या बालिकेने थांबविले, आणि त्यांचे पाय धरले. आम्हाला वाचवा..तो मारुन टाकेन असे बोलत होते. यावेळी दोन्ही बहिणी प्रचंड भेदरलेल्या होत्या तर एकीचा रक्तस्त्राव सुरु होता. हा प्रकार पाहून या दाम्पत्याने दोघांना गावात आणले नंतर गावकऱ्यांनी त्यांना वैजापूर आरोग्य केंद्रात नेले. तेथे तपासणीअंती बालिकेवर अमानूष पध्दतीने अत्याचार झाल्याचे निष्पन्न झाले. डॉ. चंद्रकांत बारेला यांच्या माध्यमातून या दोन्ही बहिणींना चोपडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर बुधवारी दुपारी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले.

दोन सख्ख्या चुलत बहिणीवर अत्याचार झाल्याची माहिती गावात पसरताच संपूर्ण गाव दोन्ही बहिणींच्या घरी जमले. यावेळी देवेंद्र भोई व त्याचे कुटुंब घरात होते. यावेळी पळून जाऊन आपला जीव वाचवणाऱ्या तिसऱ्या मुलीने मात्र संशयिताचे नाव सांगितले आणि त्याला ओळखलेही. यानंतर रात्री उशीरा त्याला अटक करण्यात आली.

या घटनेच्या निषेधार्थ आणि संशयिताविरुध्द अ‍ॅट्रासिटीचे वाढीव कलम लावावे, खटला जलदगती न्यायालयात चालवावा व त्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी १५ ऑगस्ट रोजी आदीवासी वसतीगृह विद्यार्थी परिषदेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला जाणार आहे. याशिवाय लोकसंघर्ष मोर्चा १६ ऑगस्ट रोजी सकाळी काढण्यात येणार आहे. याशिवाय विविध संघटनांच्या वतीने जन आक्रोश मोर्चाचे आयोजनही करण्यात आले आहे.

डॉ.चंद्रकांत बारेला, प्रतिभा शिंदे, प्रकाश बारेला, संजय शिरसाठ, बुधा बारेला, गाजू बारेला, धर्मा बारेला, प्रदीप बारेला, संदीप मोरे, मोतीलाल बारेला, ज्ञानेश्वर भादले, रघुनाथ जोशी, सचिन धांडे, विनोद देशमुख, संजू बारेला, दयाराम बारेला, दिनू बारेला यांनी सर्वांना मोर्चामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like