कुत्र्याच्या चाटण्यामुळं एकाचा मृत्यू, ‘केस’ पाहून डॉक्टरही ‘हैराण’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कुत्राच्या चाटण्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. कुत्र्याच्या चाटण्यामुळे 63 वर्षीय माणूस आजारी पडला होता. याबाबत बर्लिनच्या Rote Kreuz Krankenhaus हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी एका मेडिकल जर्नलमध्ये माहिती प्रकाशित केली आहे. युरोपियन जर्नल ऑफ केस रिपोर्ट्स इन इंटर्नल मेडिसिन मध्ये हे प्रकरण प्रकाशित करण्यात आलं आहे. डॉक्टरांचं म्हणणं आहे की, जोपर्यंत कुत्र त्या व्यक्तीला चाटत नव्हतं तोपर्यंत तो व्यक्ती निरोगी होता. परंतु नंतर मात्र तो आजारी पडला. त्या व्यक्तीनं 2 आठवडे रुग्णालयात घालवले. त्यानंतर त्याचा मृत्यू झाला.

सदर व्यक्ती आजारी असताना त्याला 106°F ताप होता. याशिवाय त्याला गैंग्रीन, Pneumonia यांसारखे आजारही होते. ज्या बॅक्टेरियामुळे त्याला संसर्ग झाला होता त्याचं नाव Capnocytophaga canimorsus आहे. साधारणपणे जनावरानं चावल्यानंतर हा बॅक्टेरिया पसरत असतो. सुरुवातीला तो व्यक्ती जेव्हा रुग्णालयात भरती झाला होता तेव्हा त्याला ताप होता आणि त्याला श्वास घ्यायला खूप त्रास व्हायचा. जसे त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले त्याचा आजार अजूनच वाढला. त्याची तब्येत सतत खराब होत होती. त्याला आयसीयुमध्ये ठेवण्यात आलं होतं.

त्याच्या चेहऱ्यावर रॅशेस झाले होते. त्याच्या किडनी आणि लिव्हरलाही काम करण्यात अडचण येत होती. त्याची स्किन अचानक सडू लागली होती. शेवटी त्याला कार्डिक अरेस्टचाही सामना करावा लागला होता. ही केस पाहून डॉक्टरही हैराण झाले होते की, कुत्र्याच्या फक्त चाटण्यामुळे त्याला एवढं खतरनाक इंफेक्शन कसं काय झालं. कारण केवळ चाटल्यामुळे खूपच कमी बॅक्टेरिया ट्रान्सफर होत असतात.

नेदरलँडच्या एका स्टडीनुसार, 15 लाख लोकांपैकी फक्त एकाला अशा स्थितीचा सामना करावा लागतो. 28 ते 30 टक्के प्रकरणात पीडिताचा मृत्यू होतो. साधारणपणे केवळ इम्युनिटी पावर कमी असलेले लोकच बॅक्टेरियाच्या संपर्कात येण्यानं आजारी पडतात. परंतु आता असे वाटत आहे की, हेल्दी लोकही याला बळी पडू शकतात. Naomi Mader नावाच्या डॉक्टरांच्या टीमनं सांगितलं, “कुत्र पाळणाऱ्या लोकांना ताप येत असेल तर त्यांनी त्वरीत डॉक्टरांकडे जायला हवं.”

Visit : Policenama.com 

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like