हास्यास्पद ! LUX COZI घातली होती युवकानं, पाकिस्तानी पोलिसांनी केलं ‘भारतीय गुप्‍तहेर’ म्हणून अटक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तान पोलिसांना पुन्हा एकदा एका भारतीय गुप्तहेराला ताब्यात घेतल्याचा दावा केला आहे, आणि हा दावा या कारणाने करण्यात आला कारण या तरुणाने लक्स कोजीचे बनियन घातले होते. पाकिस्तान पोलिसांच्या मते हा युवक भारतीय नागरिक असून त्याचे नाव राजू लक्ष्मी आहे. जो पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात हेरगिरी करत होता. या तरुणाला पोलिसांनी तेव्हा ताब्यात घेतले जेव्हा तो बलुचिस्तान प्रांताच्या डेरा गाजी खान या भागात फिरत आहे.

लक्स कोजी बनियन घातले म्हणून पकडले

पाकिस्तानी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या युवकाने घातलेल्या लक्स कोजी (LUX COZI) बनियनचे फोटो देखील जारी केले आहेत. ज्यावर ‘मेड इन इंडिया’ लिहण्यात आले आहे, यावर आता पाकिस्तान हा दावा करत आहेत की हा तरुण भारतीय आहे.

परंतू पाकिस्तानने केलेल्या या दाव्याला सोशल मिडियावर चांगलेच ट्रोल केले जात आहे. लोकांनी म्हणत आहे की पाकिस्तानने एका गरीब तरुणाला फक्त यासाठी ताब्यात घेतले आहे कारण त्याने लक्स कोजी बनियन घातले आहे.

पाकिस्तान सोशल मिडियावर ट्रोल

सोशल मिडियावर ट्रोल करताना लोक म्हणत आहेत की पाकिस्तानी पोलिसांकडून बनियन घातलेल्या तरुणाला भारतीय गुप्तहेर समजले जात आहे. आता ICJ समोर पाकिस्तान लक्स कोजीचे बनियन पुरावा म्हणून दाखवतील.

दुसरीकडे पाकिस्तानी मिडिया देखील या तरुणाला भारतीय गुप्तहेर म्हणून दाखवत आहे. त्यांचे म्हणणे आहे की भारताने आपला गुप्तहेर बलुचिस्तानमध्ये पाठवले आहे परंतू पाकिस्तानी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

या आधी भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने भारतीय गुप्तहेर म्हणून ताब्यात घेण्यात आले होते. पाकिस्तानचा दावा आहे की त्यांनी सुरक्षा बलाकडून कुलभूषण जाधव यांना मार्च २०१६ मध्ये बलुचिस्तान प्रांतातून ताब्यात घेतले. सध्या हे प्रकरण आंतरराष्ट्रीय न्यायलायात आहे.

आरोग्यविषयक वृत्त –