Manasi Naik | मानसी नाईकचे नवीन हिंदी गाणे प्रदर्शित; ‘दिल टूटा हैं….”

पोलीसनामा ऑनलाइन : Manasi Naik | आपल्या उत्तम नृत्य शैलीने प्रत्येकांनाच वेड लावणाऱ्या अभिनेत्री मानसी नाईकला आज वेगळ्या ओळखीची अशी काही गरज नाही. ‘बघतोय रिक्षावाला’, ‘बाई वाड्यावर’ या गाण्यातून ती आज चाहत्यांच्या मनामनात पोहोचली आहे. आता मानसी लवकरच हिंदी अल्बम मध्ये देखील दिसणार असल्यामुळे मोठया प्रमाणात चर्चेत आली आहे. ‘दिल टूटा हैं तो क्या’ असे गाण्याचे शीर्षक असून हे गाणे युट्युब वर देखील प्रदर्शित झाले आहे. हे गाणे स्वरूप भालवणकर यांनी संगीतबद्ध आणि गायले आहे. आता मानसीने तिच्या या गाण्यावरच भाष्य केले आहे. जे सर्वांचेच लक्ष वेधून घेताना दिसत आहेत. (Manasi Naik)

मानसी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. तिचे विविध फोटोज आणि व्हिडिओज ती चाहत्यांसाठी शेअर करत असते. गेल्या अनेक दिवसांपासून मानसी तिच्या खाजगी आयुष्यामुळे चर्चेत होती. आता तिने तिच्या ‘दिल टूटा हैं तो क्या’ या गाण्यावर भाष्य केले आहे. यावर बोलताना ती म्हणाली हा माझा पहिला व्हिडिओ अल्बम आहे मात्र हे गाणे माझ्या वास्तविक जीवनातून प्रेरित नव्हते. (Manasi Naik)

पुढे बोलताना ती म्हणाली, “बऱ्याच लोकांना हे गाणे माझ्या वास्तविक जीवनानी प्रेरित असल्याचे वाटले होते.
हे गाणं सकारात्मक दृष्टिकोन देणारे आहे”. आता मानसी नाईकने एक गुड न्यूज देखील दिली आहे.
ती म्हणजे मानसी लवकरच हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे.
तिने तिच्या आगामी चित्रपटाचे पोस्टरही शेअर केले आहे.
मानसीच्या पहिल्या हिंदी चित्रपटाचे नाव “सिफर” असे आहे.
तर या चित्रपटाचे विनोद वैद्य यांनी दिग्दर्शन आणि लेखन केले आहे.
हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले जात आहे.
या चित्रपटाबाबत अद्याप तरी अजून कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

Web Title :- Manasi Naik | marathi actress manasi naik commented on dil tuta hain new hindi song