Video : गरमीमध्ये शूट केल्यानंतर ‘या’ अभिनेत्रीने बाथटबमध्ये काढला ‘थकवा’ ; ‘हॉट’ व्हिडीओमुळे वातावरण ‘गरम’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अॅक्ट्रेस मंदाना करीमी सध्या आपला आगामी सिनेमा कोकाकोलाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमाची अधिकाधिक शुटींग नोएडा आणि उत्तर प्रदेशातील काही भागात होत आहे. नुकतीच ती नोएडा शेड्युलची शुटींग करून परतली आहे. या सिनेमात मंदाना करीमीसोबत सनी लिओनी प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

या सिनेमातील काही खास सीन आंबाच्या बागेत शुट केले आहेत. यावेळी मंदाना आंबाच्या बागेत आंबे खातानाही दिसत आहे. मंदानाने तिचा हा आंबा खातानाचा व्हिडीओही शेअर केला आहे.

युपीच्या जबरदस्त गरमीमध्ये शुटींग करणारी मंदाना करीमी हॉट बाथ टबमध्ये आपला थकवा काढताना दिसली. यादरम्यानचा एक व्हिडीओ मंदानाने शेअर केला आहे. मंदानाने तिच्या इंस्टा अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करत लिहिले आहे की, “दिवसभर काम करू खूपच टॅन झाले आहे.”

मंदाना आणि सनी लिओनीचा आणखी एक फोटो समोर आला आहे. या फोटोत दोघीही अभिनेत्री झाडावर बसल्या आहेत असे दिसत आहे. हा शुटींगदरम्यानचा सेटवरील फोटो आहे असे समजत आहे. सेटवरून फोटो समोर येण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही सिनेमाच्या सेटवरून अनेकदा असे फोटो समोर आले आहेत. सनीने अनेकदा व्हिडीओदेखील शेअर केले आहेत.

मंदाना करीमी सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टीव असते. आपल्या चाहत्यांसाठी मंदाना नेहमीच आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. मंदाना करीमीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, सध्या ती कोकाकोला या सिनेमाच्याच शुटींगमध्ये व्यस्त आहे. मंदाना याआधी बिग बॉसमध्ये दिसली आहे. मंदानाचे काही दिवसांपूर्वी काही हॉट आणि सेक्सी फोटो व्हायरल झाले होते तेव्हाही ती चर्चेत आली होती.

 

सावधान ! तर मुलांना होऊ शकतो ‘हाय बीपी’चा धोका, ‘ही’ आहेत कारणे

पावसाळ्यात माशांमुळे पसरू शकते रोगराई, असा टाळा उपद्रव

मिठाच्या अधिक सेवनाने येऊ शकते आतड्यांवर सूज

झोप येत नाही ? मग करा हा प्रयोग, शांत झोप येईल

 

Loading...
You might also like