मेनका गांधी देणार सोनिया गांधींना शपथ ? सोनिया गांधी मेनकांना म्हणणार ‘मॅडम’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  – भाजपच्या विजयानंतर आता चर्चा सुरु आहे ती हि की कोणाला कोणते पद देणार? भाजपच्या खासदार मेनका गांधी यांना सभापती पदावर बसवले जाऊ शकते अशी चर्चा सध्या भाजपमध्ये सुरु आहे. तसेच संसदेतील एक वरिष्ठ खासदार म्हणून प्रोटेम स्पीकर म्हणून त्यांची निवड होऊ शकते . असे झाले तर त्या सर्व खासदारांना आपल्या पदाची अथवा खासदारकीची शपथ देऊ शकतात. त्यामुळे यात काँग्रेसच्या खासदार सोनिया गांधी यांची देखील ते शपथ घेऊ शकतात. त्यामुळे सोनिया गांधींना त्याची जाऊबाई शपथ देऊ शकते अशी चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे संसदेत अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते की सोनिया गांधी यांना मेनका गांधी यांना मॅडम स्पीकर अशी म्हणण्याची वेळ येऊ शकते.

या दोघीजणी देशातील सर्वात मोठ्या राजकीय घराण्यातील सुना आहेत. परंतू आपापसातील मतभेदांमुळे त्यांचे राजकीय मार्ग वेगवेळे आहेत. एकीकडे सोनिया गांधी काँग्रेसच्या प्रमुख नेत्या आहेत तर दुसरीकडे मेनका गांधी भाजपच्या नेत्या. त्या एकमेंकीच्या समोर देखील येत नाहीत. आज पर्यत राजकीय शिष्टाचार सांभाळून त्या सार्वजिक समारोहामध्ये एकमेकींना भेटून विचारपूस करत आहेत असे फोटो देखील अजून कधीही समोर आलेले नाहीत.

आता अशी परिस्थिती आणि वाद असताना या दोघींना एकमेकींच्या समोर येण्याची परिस्थिती आलेली आहे. प्रोटेम स्पीकर म्हणून मेनका गांधी यांना सोनिया गांधींना शपथ द्यावी लागू शकते तर सोनिया गांधी यांना मेनका गांधींना स्पीकर मॅडम म्हणण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते.

2014 साली मेनका गांधी यांनी सोनिया गांधी यांच्यावर टीका केली होती. सोनिया आपल्या बरोबर हुंड्यात सासरी काही घेऊन आल्या नव्हत्या मग त्या इतक्या श्रींमत कशा असा खोडकर सवाल मेनका गांधी यांनी सोनियांना विचारत त्यांच्यावर निशाणा साधला होता. त्यांनी त्यांचाकडे असलेल्या संपत्तीवर बोट ठेवले होते. या प्रकारावरुनच त्यांच्यातील वादाची परिस्थिती लक्षात येते आणि त्यांच्यातील संबंध स्पष्ट होतात. त्यामुळे असे असल्याने मेनका गांधी प्रोटेम स्पीकर होतील का आणि सोनिया गांधींना शपथ देतील का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.