काॅंग्रेस चे जेष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांचा उपसभापती पदाचा राजीनामा

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन 
काँग्रेसचे जेष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांनी पदाचा कार्यकाळ संपण्यापूर्वीच राजीनामा दिल्याचे वृत्त समोर आले आहे. त्यांनी सभापतींकडे राजीनामा सपुर्दही केला आहे. पक्षाने विधानपरिषदेची उमेदवारी नाकारल्याने माणिकरावांनी हा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे.
या बाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी नुकतीच पक्षाची एक भूमिका जाहीर केली होती. त्यात त्यांनी ‘पक्षाचे जे उमेदवार निवडणूक लढवू शकतात, त्यांना विधानपरिषद, राज्यसभा यांचे तिकीट द्यायचे नसल्याची भूमिका जाहीर केली होती.’

[amazon_link asins=’B00MFNJPVA’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’408e537a-8a86-11e8-bec7-f7119107e998′]

काँग्रेसचे जेष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांनी सभापतींकडे राजीनामा सोपवल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून मिळाल्याची प्रतिक्रिया शिवसंग्राम पक्षाचे नेते आमदार विनायक मेटे यांनी दिली आहे. सभागृहाला राजीनाम्याची माहिती देणे गरजेचं होतं म्हणून मी हा प्रश्न उपस्थित केला. राजीनामा देण्यामागे त्यांच्यावर कोणता दबाव होता की नाराजी होती हे तेच सांगू शकतील असे मेटे म्हणाले.
परंतु काँग्रेसने विधानपरिषदेची उमेदवारी नाकारल्याने माणिकराव ठाकरे यांनी हा राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटलं जात आहे. मात्र ‘नवीन लोकांना निवडून येण्याची संधी मिळावी म्हणून आपण राजीनामा देत असल्याचे ठाकरे यांनी सांगितले आहे.’
[amazon_link asins=’B076H74F8N’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’55e93e51-8a86-11e8-8986-7505f0eea9db’]