Manisha Koirala | 90 चे दशक गाजवणारी अभिनेत्री मनीषा कोईराला हिने घटकस्फोटानंतर दुसऱ्या लग्नाबदद्ल केले मत व्यक्त

पोलीसनामा ऑनलाइन – बॉम्बे चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री मनीषा कोईराला (Manisha Koirala) हिने बॉलीवुडचे 90 चे दशक गाजवले आहे. शाहरुख खान (Shah Rukh Khan), अमीर खान (Aamir Khan), गोविंदा (Govinda), अनिल कपूर (Anil Kapoor) यांच्या सोबत स्क्रीन शेअर करणारी टॉपची अभिनेत्री मनीषा ही सध्या चर्चेत आहे. मुळची नेपाळची असलेल्या मनीषाने 2010 साली नेपाळमधील उद्योगपती सम्राट दहल (Samrat Dahal) यांच्याशी प्रेमविवाह केला होता. मात्र हे नाते दीर्घकाळ टिकले नाही. अवघ्या 2 वर्षांत त्यांच्या घटस्फोट (Manisha Koirala Divorce) झाला. 2012 पासून ती विभक्त राहत आहे. मनीषाने आता तिच्या दुसऱ्या लग्नाबाबत वक्तव्य केलं आहे.

 

 

 

 

एका शोला दिलेल्या मुलाखतीमध्ये अभिनेत्री मनीषा कोईराला हिने तिच्या दुसऱ्या लग्नाबद्दल (Manisha Koirala 2nd Marriage) सांगितले आहे. मनीषा म्हणाली की, “दुसऱ्यांदा लग्न करण्याची वेळ निघून गेली आहे, नाही का? कधी कधी मला वाटतं की माझा जोडीदार असता तर आयुष्य आतापेक्षा जास्त चांगलं असतं? मला माहीत नाही. पण मला माझं आयुष्य पूर्ण झाल्यासारखं वाटतं. माझा कुत्रा आणि मांजर हिच माझी मुलं आहेत, त्यांची नावं मोगली आणि सिम्बा अशी ठेवली आहेत. शिवाय माझ्या आयुष्यात खूप प्रेमळ मित्र व आई-वडील माझ्यासोबत आहेत. तरीही, कधी कधी मला प्रश्न पडतो की जर मला जोडीदार मिळाला असता तर आयुष्य आतापेक्षा चांगलं असतं का?” असे मत मनिषाने मांडले.

 

 

 

 

पुढे मनिषा म्हणाली, “मला माहीत आहे की सध्याच्या जगात मुलाचे पालनपोषण व संगोपन करणं अत्यंत जबाबदारीचं काम आहे. ज्यावेळेस मला स्वतःला अशी खात्री पटेल की मी एकटी आई म्हणून मुलाची जबाबदारी पार पाडू शकते, तेव्हा मी ती जबाबदारी घेईन. सध्या मी माझ्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करत आहे आणि ज्या गोष्टी मला करायच्या आहेत, त्या मी करत आहे. मी या गोष्टींचा आनंद घेत आहे. जर मी या सर्व गोष्टी सोडून फक्त पालक होण्यावर लक्ष केंद्रित करू शकले तर मला ते करायला आवडेल.”

 

 

 

अभिनेत्री मनिषा कोईराला (Manisha Koirala) हिचा मोठा चाहता वर्ग आजही आहे. 90 च्या दशकात तिने अनेक हिट सिनेमे दिले. तिने बॉम्बे (Bombay), मन (Mann), दिल से (Dil Se), मुधालवन (Mudhalvan) यासारख्या हिट चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. ती ‘शहजादा’ (Shahzada) चित्रपटात कार्तिक आर्यनच्या (Kartik Aryan) आईच्या भूमिकेत झळकली होती.

 

 

 

Web Title :  Manisha Koirala | manisha koirala talks about second marriage after divorced with samrat dahal years back

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा