केमिकल टँकर अन् ट्रकची समोरासमोर धडक; भीषण आग लागून दोघांचा होरपळून मृत्यू

मनमाड : पोलीसनामा ऑनलाइन –  केमिकल टॅंकर आणि आयशर ट्रक यांची समोरासमोर धडक झाली. या धडकेत दोन्ही वाहनांना अचानक पेट घेतला. हा अपघात इतका भीषण होता की, यात दोन्ही वाहने जळून खाक झाली असून दोघांचा होरपळून मृत्यू झाला आहे. मनमाड-मालेगाव मार्गावर(Manmad-Malegaon road) कौळाने जवळ सोमवारी (दि. 31) रात्री ही घटना घडली आहे. अपघातामुळे मनमाड-मालेगाव मार्गावरील(Manmad-Malegaon road) वाहतूक 3 तास खोळंबली होती.

लसीकरणाच्या मुद्द्यावरुन SC ने मोदी सरकारला पुन्हा फटकारले, म्हणाले – ‘कठोर निर्णय घेण्यास भाग पाडू नका’

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केमिकल टँकर पुण्यातून राजस्थानकडे जात होता. तर आयशर ट्रक मनमाडकडे येताना हा भीषण अपघात झाला. घनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. अपघातामुळे मनमाड-मालेगाव मार्गावरील सुमारे 3 तास वाहतुकीचा खोळंबा झाला होता. आग आटोक्यात येताच दोन्ही वाहने हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली.

घरगुती LPG गॅस सिलेंडर आज ‘स्वस्त’ झाला की ‘महाग’; जाणून घ्या 1 जूनचे दर
नव्या महिन्याची सुरुवात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीने; जाणून घ्या आज काय आहेत इंधनाचे दर

लसीकरणाच्या मुद्द्यावरुन SC ने मोदी सरकारला पुन्हा फटकारले, म्हणाले – ‘कठोर निर्णय घेण्यास भाग पाडू नका’

Black Fungus : कोरोनातून रिकव्हरीनंतर सुद्धा होऊ शकतो ब्लॅक फंगसचा धोका, ‘या’ लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष; जाणून घ्या