Mann Ki Baat 100 Episode | विलेपार्ले येथील ‘मन की बात’ कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्र्यांसह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची उपस्थिती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Mann Ki Baat 100 Episode | प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या ‘मन की बात’ या आकाशवाणीवरून सादर होणाऱ्या आजच्या शतकी कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah), मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विलेपार्ले येथील घैसास सभागृहात (Keshavrao Ghaisas Auditorium in Vile Parle East, Mumbai) उपस्थित होते. (Mann Ki Baat 100 Episode)

 

कार्यक्रमाला खासदार पूनम महाजन (MP Poonam Mahajan), आमदार आशिष शेलार (MLA Ashish Shelar), आमदार पराग आळवणी (MLA Parag Alavani), माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत (Dr. Deepak Sawant), मराठी अभिनेते सचिन खेडेकर (Sachin Khedekar) यांच्यासह विलेपार्ले परिसरातील सर्व क्षेत्रातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. (Mann Ki Baat 100 Episode)

सर्व मान्यवरांचे सकाळी 10.45 वाजता घैसास सभागृहात आगमन झाले. मान्यवरांच्या सन्मान कार्यक्रमानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 100 व्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचे प्रसारण सुरू झाले. लोकप्रतिनिधींसह सामान्य नागरिकांनी टाळ्या वाजवून 100 व्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचे स्वागत केले. या कार्यक्रमाच्या प्रक्षेपणाची सोय मुंबईतील 5 हजार 200 ठिकाणी करण्यात आली होती.

 

Web Title :  JSB Bank Ltd | Kishor Bhagwan Tarwade unopposed as Director of Jaibhavani Sahakari Bank Ltd

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा