Manohar Joshi Health Updates | मनोहर जोशी यांच्या प्रकृतीत 22 दिवसांच्या उपचारानंतर सुधारणा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Manohar Joshi Health Updates | शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची प्रकृती खालावल्याने दि. 22 मे रोजी हिंदुजा रुग्णालयात (Hinduja Hospital) दाखल करण्यात आले होते. सुरुवातीला त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. परंतु, आता त्यांची प्रकृती सुधारली असून मनोहर जोशी यांना सोमवार (12 जून) रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज (Discharge) देण्यात आला आहे. (Manohar Joshi Health Updates)

मनोहर जोशी यांना मेंदूशी संबंधित व्याधी आहे. 22 मे रोजी अस्वस्थ वाटू लागल्यानंतर मनोहर जोशी यांना तातडीने हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर हिंदुजा रुग्णालयात (Hinduja Hospital) आयसीयूमध्ये (ICU) उपचार सुरू होते. आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. (Manohar Joshi Health Updates)

मनोहर जोशी यांच्यावर गेल्या 22 दिवसांपासून उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती बरी व्हावी यासाठी रुग्णालय प्रशासनाची (Hospital Administration) एक टीम सातत्याने त्यांच्यावर लक्ष ठेवून होती. त्यांच्या प्रकृतीची काळजी घेतली जात होती. तसेच ते बरे व्हावेत यासाठी उपचार सुरु होते. मनोहर जोशी बरे व्हावेत यासाठी अनेकांनी प्रार्थना केली होती. जोशी यांच्या प्रकृतीत आता सुधारण झाली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

Web Title :  Manohar Joshi Health Updates | former maharashtra cm and shivsena leader manohar joshi discharged from pd hinduja hospital

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune ACB Trap News | येरवडा पोलिस ठाण्यातील ‘खाबुगिरी’ चव्हाट्यावर ! मध्यरात्री लाचखोर हवालदार अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात, 3 पोलिसांविरूध्द गुन्हा दाखल झाल्याने प्रचंड खळबळ

Petrol-Diesel Price Today | प्रमुख शहरातील पेट्रोल-डिझेलचा दर काय? 1 लिटरसाठी द्यावे लागतील इतके रुपये; जाणून घ्या

Pune Gold Rate Today | पुणेकरांसाठी खुशखबर! सोन्या-चांदीच्या किमतीत घसरण; जाणून घ्या आजचे दर

Pune Marketyard Fir News | मार्केटयार्ड परिसरात भीषण आग; 2 कामगारांचा होरपळून मृत्यू, एकजण गंभीर जखमी