Manohar Mama Bhosale | मनोहर मामा भोसलेचा पोलीस कोठडीतील मुक्काम वाढला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – आपल्याकडे काही दैवीशक्ती असून आपण कॅन्सर (Cancer) बरा करू शकतो असा दावा करणाऱ्या मनोहर भोसले उर्फ मनोहर मामा (Manohar Mama Bhosale) याच्या साताऱ्यातून मुसक्या आवळल्या. यानंतर त्याला अतिरिक्त व जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी न्यायालयाने त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. पोलीस कोठडीची मुदत आज (गुरुवार) संपल्याने त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने मनोहर मामा भोसलेला (Manohar Mama Bhosale) 3 दिवसांची पोलीस कोठडी (police custody) सुनावली.

काय आहे प्रकरण

मनोहर मामा भोसले याने बारामती शहरातील (Baramati City) शशिकांत खरात यांची 2 लाख 51 हजार 500 रुपयांची फसवणूक केली होती. खरात यांच्या वडीलांना कॅन्सर झाला होता. कोणतीही शस्त्रक्रिया न करता कॅन्सर (Cancer) बरा करण्याच्या नावाखाली मनोहर मामा भोसले याने पैसे उकळल्याचा आरोप खरात यांनी केला आहे. याप्रकरणी खरात यांनी बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात (Baramati Rural Police Station) तक्रार दाखल केली होती.

त्यानुसार पोलिसांनी मनोहर मामा विरोधात गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी मनोहर मामा फरार झाला होता.
पुणे ग्रामीण पोलीसांच्या स्थानिक गुन्हे शाखा (Pune Rural Police LCB) व बारामती तालुका पोलिसांनी मनोहर मामाला शुक्रवारी (दि.9) सातारा जिल्ह्यातील सालपे येथी फार्महाऊसवर जाऊन अटक केली होती.
मनोहर मामाला अटक करुन बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात आणण्यात आले.
त्यानंतर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती.
पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख (SP Pune Rural, Dr. Abhinav Deshmukh), बारामतीचे अप्पर पोलिस अधीक्षक मिलींद मोहिते (Baramati Addl SP, Milind Mohite) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक महेश ढवाण (Police Inspector Mahesh Dhavan) अधिक तपास करीत आहेत.

हे देखील वाचा

Weather Alert | हवामान विभागाचा अलर्ट ! 18 सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्रासह ‘या’ राज्यांमध्ये होईल जोरदार पाऊस, ‘वीज’ कोसळण्याची शक्यता

Corona दरम्यान Sepsis चा वाढला धोका, कॅन्सर आणि हार्टअटॅकने सुद्धा जाऊ शकतो जास्त लोकांचा जीव

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Manohar Mama Bhosale | Manohar Mama Bhosale’s stay in the police cell was extended

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update