Manoj Jarange Patil | अखेर मनोज जरांगे यांच्यावर दोन ठिकाणी गुन्हा दाखल, सरकारने कारवाईचा फास आवळला

मुंबई : ओबीसीतून मराठा आरक्षण (Maratha Reservation) देण्याच्या मागणीसाठी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी मराठा समाजाला रास्तारोको आंदोलनाचा कार्यक्रम दिला होता. त्यानुसार अनेक ठिकाणी आंदोलने झाली. याप्रकरणी बीडच्या शिरूर आणि अमनेरमध्ये जरांगे यांच्यावर गुन्हा (Beed And Amalner Police Fir) दाखल करण्यात आला आहे.(Manoj Jarange Patil)

मराठा आरक्षणासाठी विनापरवाना रास्तारोको आंदोलन केल्याप्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. मराठवाड्यात तब्बल १४६६ जणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. ही कारवाई खुपच मोठी असल्याचे बोलले जात आहे.

काल अंतरवाली सराटीमध्ये मराठा समाजाच्या बैठकीत जरांगे यांनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर परिस्थिती आणखी बिघडली.
त्यातच जरांगे यांनी फडणवीसांना आव्हान देत अचानक मुंबईची वाट धरल्याने एकच गोंधळ उडाला होता.

मात्र, त्यानंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच मराठा समाजाने विनंती केल्यानंतर जरांगे यांनी पुन्हा
अंतरवाली सराटीत जाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आता सरकारने जरांगे यांच्यावर कारवाईचे अस्त्र उचलले आहे.

दरम्यान, मराठा समाजाने ठिकठिकाणी केलेल्या आंदोलनाची दखल घेत अंतरवाली सराटीमध्ये उपोषणाला बसलेले
मनोज जरांगे यांच्यावर बीडच्या शिरूर आणि अमनेरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच मनोज जरांगे यांच्या सूचनेनुसार विविध ठिकाणी रास्ता रोको केल्याप्रकरणी मराठवाड्यात तब्बल १०४१ जणांवर
तर बीड जिल्ह्यातील ४२५ जणांवर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Warje Malwadi Crime | अश्लील हावभाव करुन डॉक्टर तरुणीचा विनयभंग, वारजे पोलिसांनी तरुणाला ठोकल्या बेड्या

पिंपरी : बनावट नोटा बाळगणाऱ्या तरुणाला देहूरोड पोलिसांकडून अटक

Pune Cheating Fraud Crime | मोठी ऑर्डर देण्याचे आमिष दाखवून व्यावसायिकाची 40 लाखांची फसवणूक, आरोपीला कर्नाटकातून अटक; वारजे माळवाडी पोलिसांची कामगिरी