Manoj Jarange Patil | सर्वपक्षीय बैठकीवरून जरांगे संतापले, ”अजून किती वेळ द्यायचा, फडणवीसांनी चर्चेला यावे, मराठे संरक्षण देतील”

जालना : Manoj Jarange Patil | मराठा आरक्षणासंदर्भात (Maratha Reservation) राज्य सरकारच्या (State Govt) आजच्या सर्वपक्षीय बैठकीत मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देण्यासाठी वेळ द्यावा, मनोज जरांगेंनी उपोषण मागे घ्यावे, यावर एकमत झाले आहे. मात्र, सर्वपक्षीय बैठकीवरून मराठा आरक्षण आंदोलनाचे (Maratha Aarakshan Andolan) नेते मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) संतापले आहेत. कारण विशेष अधिवेशनाबाबत या बैठकीत काहीच निर्णय झाला नाही. जरांगे म्हणाले, अजून किती वेळ द्यायचा. आम्ही चर्चेला चार दिवसांपासून बोलवतोय, पण येत नाहीत. यांना काड्या घालायची सवय लागली आहे. फडणवीसांनी चर्चेला यावे, मराठे संरक्षण देतील, असे जरांगे म्हणाले.

राज्य सरकारने बोलावलेल्या आजच्या सर्वपक्षीय बैठकीनंतर जालन्यातील अंतरवाली सराठी येथे आमरण उपोषणासाठी बसलेले मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी मनोज जरांगे म्हणाले, सरकारने आता वेळ मागितला आहे. मी उपोणषाला बसून ७-८ दिवस झाले. पण, आता सांगत आहेत की वेळ पाहिजे. कशासाठी आणि किती वेळ पाहिजे ते सरकारने सांगावे. मग मी समाजाशी बोलून वेळ द्यायचा की नाही ते ठरवतो.

जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी सर्वपक्षीय बैठकीतील निर्णयांवर संताप व्यक्त करताना म्हटले की, आजच्या बैठकीतील तपशील पाहण्याची माझी इच्छा नाही. गोर गरिबांच्या पोरांना अन्याय सहन करावा लागत असताना हे नेते हसण्यावारी नेत आहेत. यांना जनता सांभाळणारे सरकार म्हणायचे का?

राज्य सरकारवर आसूड ओढताना जरांगे म्हणाले, आम्ही चर्चेला चार दिवसांपासून बोलवत आहोत, पण ते येत नाहीत.
पण यांना काड्या घालायची सवय लागली आहे. त्यामुळे मराठ्यांमध्ये दम निघत नाही. मराठे तापट आहेत.
तुम्हाला आरक्षणासाठी वेळ हवा असेल तर मला बोलता येत आहे तोपर्यंत चर्चेसाठी या. तुम्हाला किती वेळ पाहिजे ते सांगा.

मनोज जरांगे म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनी चर्चेसाठी यावे, रस्त्यावर तुम्हाला कोणीही अडवणार नाही.
माझे मराठा तुम्हाला संरक्षण देतील. पण आज संध्याकाळपासून मी पाणीही सोडणार आहे.
मग बघू मराठ्यांना कसे आरक्षण देत नाहीत.

जरांगे म्हणाले, मराठ्यांना कसे आरक्षण देणार आहेत हे सांगावे. वेळ घेतल्यानंतर सरसकट आरक्षण देणार आहात का?
हे सांगा. त्यानंतर आम्ही वेळ द्यायचा की नाही ते ठरवू. नाहीतर पाच मिनिटांचाही वेळ देणार नाही. मग काय व्हायचे ते पाहू.

जरांगे म्हणाले, आमच्या रक्तामासांत लढण्याची शक्ती आहे. त्यामुळे सरकारने बाजारचाळे करू नये, नेट सुरू करा.
मराठे शांततेत आंदोलन करणार. ही लढाई आरपारची आहे. नेट बंद केल्याने आंदोलन थांबणार नाही.
आरक्षण मिळाल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही.

जरांगे म्हणाले, सर्वपक्षीय बैठकीत सर्व नेते होते. कोणताच पक्ष आपला नाही हे आता मराठ्यांना समजले.
आज रात्रीपासून पाणी बंद करणार आहे. उद्रेकाला आमचे समर्थन नाही, आमचे आंदोलन शांततेत सुरू राहणार आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | पोलीस हवालदाराकडून छत्तीसगडमधून पळून आलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार; हवालदाराचा साथीदार अटकेत

All Political Parties Meeting On Maratha Reservation | मराठा आरक्षणविषयक सर्वपक्षीय बैठकीत एकमुखी ठराव ! राज्यात शांतता, कायदा सुव्यवस्था राखण्याचे आवाहन