Manoj Jarange Patil | शिवभक्त मनोज जरांगेंनी किल्ले रायगड अनवाणी पायांनी केला सर, राजदरबारी दंडवत

महाड : मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलनाचे नेते मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) आज किल्ले रायगडावर (Raigad Fort) होते. त्यांनी अनवाणी पायांनी गडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) समाधीचे दर्शन घेतले. रायगडावरील माती त्यांनी कपाळी लावली. त्यांची शिवभक्ती तिथे उपस्थित सर्वांनी अनुभवली. (Manoj Jarange Patil)

यावेळी मनोज जरांगे म्हणाले, आज छत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक होऊन आशीर्वाद घेतला आहे. या पवित्र भूमीची माती कपाळी लावली. मराठा आरक्षणाबाबत जो काही अन्याय होत आहे, तो लढा आता शंभर टक्के पूर्ण होणार. ज्याप्रमाणे मराठे स्वराज्यात एकवटले होते, त्याचप्रमाणे आता एकवटले आहेत.

जरांगे म्हणाले, ज्यांनी देशाला स्वराज्य दिलं, त्या दैवताच्या पवित्र भूमीवर आपण पहिल्यांदा तरी पायात चप्पल न घालता गेलं पाहिजे यासाठी अनवाणी पायांनी आलो.

मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) म्हणाले, मराठा आरक्षणाचा लढा खूप दिवसांचा आहे.
आता मराठा समाजाचे पुरावे देखील सापडले आहे. त्यामुळे, मराठा समाजाचा संयम न पाहता,
तात्काळ पन्नास टक्क्यांच्या आत ओबीसीमधून मराठा समाजाला सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र देऊन आरक्षण द्यावे,
अशी रायगडावरून मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadanvis)
आणि उपमुख्यमंत्री पवार (Ajit Pawar) यांना विनंती करत आहे.

जरांगे म्हणाले, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर मराठा समाजाचा विश्वास आहे.
मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याजवळ जाऊन शपथ घेतल्याने त्यांच्यावर मराठा समाजाला अत्यंत विश्वास आहे.
२४ डिसेंबरच्या आत मुख्यमंत्री साहेब मराठ्यांच्या लेकरांना नक्कीच न्याय देतील.

जरांगे पुढे म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी देखील अनेक शब्द पाळले आहेत, आताही पाळतील.
छ. शिवाजी महाराजांनी सरकारला आशीर्वाद आणि सद्बुद्धी द्यावी.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

भुजबळ-जरांगे वादात रोहित पवारांची उडी, भाजपाने स्क्रिप्ट लिहून दिल्याचा गंभीर आरोप

आरक्षण हवे असेल तर कुणबी शब्द धारण केलाच पाहिजे, मनोज जरांगेंचं आवाहन